Latest Marathi News | ‘शिष्यवृत्ती’चा अंतरिम निकाल जाहीर; गुणपडताळणीसाठी 17 पर्यंत मुदत उपलब्‍ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

scholarship News

Nashik : ‘शिष्यवृत्ती’चा अंतरिम निकाल जाहीर; गुणपडताळणीसाठी 17 पर्यंत मुदत उपलब्‍ध

नाशिक : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांचा (आठवी) अंतरिम निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी १७ नोव्‍हेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे. त्‍यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल. (Interim Result of Scholarship Announced Deadline available for verification till 17th Nashik Latest Marathi News)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यावर्षी ३१ जुलैला इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा तसेच शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. पाचवी व आठव्‍या इयत्तेतील शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम (तात्‍पुरता) निकाल काल (ता.७) सायंकाळी सहाला परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला होता. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येणार असल्‍यचे परीक्षा परीषदेतर्फे स्‍पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घेण्यासाठी संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये १७ नोव्‍हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन दिले जातील. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरसाठी पन्नास रुपये प्रमाणे शुल्‍काची रक्‍कम आकारली जाईल. ही रक्‍कम ऑनलाइन पेमेंटद्वारे भरावी लागणार आहे.

हेही वाचा: Nashik : सातपूरचा रोहित दुसऱ्यांदा ‘IRONMAN’

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी/ग्रामीण, अभ्यासक्रम आदींमध्ये दुरुस्तीसाठी याच मुदतीत शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. या ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने अर्ज पाठविल्यास, ते स्वीकारले जाणार नाहीत.

विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे स्‍पष्ट करण्यात आले आहे. प्राप्त अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये, अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीस दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

हेही वाचा: Army Recruitment : युवकांना खुणावतेय ‘सैन्यदल’; दरवर्षी 10 हजार युवकांचे प्रयत्‍न

टॅग्स :NashikScholarship