नाशिक- दोन वर्षांपासून नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे विभागांतर्गत खंडणी विरोधी, गुंडा विरोधी व अमली पदार्थ विरोधी (एनडीपीएस) ही तीन पथके कार्यरत आहेत. मात्र, या पथकांमध्ये अंतर्गत खदखद आता पोलिस दलासह शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. खंडणी विरोधी पथकाला काही महिन्यांपूर्वी पूर्णवेळ वरिष्ठ निरीक्षक मिळाल्यानंतर पथकाने बऱ्याच महिन्यांनी गुन्हे शोधाला प्राधान्य दिले आहे. त्यातच खंडणी विरोधी पथकाने नुकतीच केलेली गांजाविरोधी कारवाई ‘कलेक्शन’ च्या मुद्द्यावरून झाल्याची चर्चा आहे. पथकांचे व ‘प्रभारीं’चे ‘कारनामे’ आता आयुक्तालयासह शहरात चर्चेचा विषय ठरत आहेत.