नाशिक रोड- केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने स्थापन केलेल्या शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत विविध सहकारी उपक्रमांची अंमलबजावणी, योजना व अडचणी याविषयी सविस्तर चर्चा झाली.