नाशिक- माता-अर्भक मृत्यू प्रकरणी महात्मानगर येथील वादग्रस्त पंड्या हॉस्पिटलची चौकशी पूर्ण झाली. त्यासंदर्भातील गोपनीय अहवाल तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्या जाणाऱ्या अहवालात चौकशीत गंभीर बाबी आढळून आल्याचा दावा केला जातो..महात्मानगर येथील पंड्या हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याचा प्रकार सप्टेंबर २०२४ मध्ये उघडकीस आला. तक्रारीनुसार महापालिकेने रुग्णालयात छापा टाकला. त्यात गर्भपातासाठी लागणारी औषधे तसेच इतर साहित्य आढळले. वास्तविक पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे बंधनकारक असताना वैद्यकीय विभागाने हॉस्पिटल रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार नोंदणी न केल्याचा गुन्हा दाखल करून कारवाई दाखविली. त्यानंतर राज्य मागासवर्गीय आयोगाने प्रकरणाकडे लक्ष वेधताना चौकशीचे आदेश दिले. वैद्यकीय विभागाने धाड टाकण्यापूर्वी रुग्णालय प्रशासनाला सावध केल्याने आवरासावर झाल्याचा संशय चौकशीत व्यक्त केला गेला. रुग्णालयावर छापा टाकला त्यावेळी झपाट्याने कर्मचारी संख्या का घटली? फक्त डॉक्टरच कसे उपस्थित होते. .आयपीडी पेपर आदी कागदपत्रे आढळून न आल्याने संशय वाढला आहे. पंड्या रुग्णालयातील प्रकार समोर आल्यानंतर महापालिका हद्दीत मुलींचा जन्मदरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याची बाब समोर आली. एक हजार पुरुषांमागे ८८७ स्त्री जन्मदर आढळल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून सोनोग्राफी सेंटरला अभय दिले जात असल्याचा संशय व्यक्त केला गेला. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एचएमआयएस पोर्टलवर गर्भधारणा, प्रसूती, गर्भपात, कॉपर-टी आदी संदर्भात माहिती भरली जात नसल्याची बाब समोर आली आहे. ६९ टक्के रुग्णालयांयकडून माहिती भरली जात नसल्याची बाब समोर आली. .राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे अहवाल पाठविणार राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या तक्रारीनुसार १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिले होते. विहित मुदतीत चौकशी अहवाल सादर न झाल्यास आयोगासमोर उपस्थित राहण्याचे समन्स पाठविण्याचा इशारा दिला होता. महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने या प्रकरणाची चौकशी केली असून, गोपनीय अहवाल तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे अहवाल सादर केला जाणार आहे..आरोग्य विभागामार्फत प्राप्त झालेल्या सूचनेनुसार माता-अर्भक मृत्यूप्रकरणी पंड्या हॉस्पिटलची चौकशी पूर्ण झाली आहे. लवकरच गोपनीय अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.- डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.