नाशिकच्या टोमॅटोला युद्धाची झळ

नाशिकच्या टोमॅटोला युद्धाची झळ
Published on: 
पान-१ ॲंकर --------------- NSK26H33760 पिंपळगाव बसवंत : टोमॅटोची प्रतवारी करताना मजूर. --------------------- नाशिकच्या टोमॅटोला इराण- इस्राईल युद्धाची झळ ------------- अरब देशांतील कंटेनरची वाहतूक महागल्याचा निर्यातीवर परिणाम ः उत्पादनखर्चही निघेना -------------- रावसाहेब उगले : सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२८ : इराण- इस्राईल युद्धामुळे अरब देशातील कंटेनरची वाहतूक महागल्याने त्याचा थेट परिणाम नाशिकच्या टोमॅटो निर्यातीवर झाला आहे. परिणामी, यंदा शेतकऱ्यांचा लागवड खर्चदेखील फिटणार नसल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना...’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी दर्जेदार टोमॅटोचे उत्पादन घेतात. त्याला अरब देशांसह बांगलादेशमध्ये मोठी मागणी असते. परंतु, यंदा इराण- इस्राईल युद्धामुळे अरबी समुद्रमार्गे ‘होर्मुझ’च्या सामुद्रधुनीतून होणारी टोमॅटोची वाहतूक दुबईतील ‘फुझेरा बंदर’द्वारे केली जात आहे. दुबईतील हे पोर्ट अत्यंत छोटे असल्याने वाहतुकीची कालमर्यादा ५ ते ६ दिवसांवरून थेट २० दिवसांवर गेली आहे. परिणामी, प्रतिकंटेनर १ लाख ८० हजार येणारा खर्च थेट दहा लाखांवर पोचला आहे. त्यामुळेच नाशिकचे व्यापारी अरब देशांमध्ये टोमॅटो पाठवत नसल्याने त्याचा थेट फटका नाशिकच्या टोमॅटो दरावर झाला आहे. ५० ते १०० रुपये प्रतिक्रेट्स (२० किलो) दर मिळत आहे. ---------------------- १६-१ कंटेनर वाहतूक परवडेना समुद्रमार्गे टोमॅटोची वाहतूक केली जाते. एका कंटेनरमध्ये १५०० क्रेट्‌स (२० किलो) असतात. टोमॅटो हंगामात नाशिकमधून सुमारे ४०० ते ५०० कंटेनर जातात. गतवर्षांपर्यंत प्रतिकंटेनर वाहतूक खर्च १ लाख ८० हजारांवर होता. परंतु युद्धामुळे अरब देशात होणारी शेतमालाची निर्यात महागली आहे. ------------------------ आयात शुल्क १३ वरून ३३ रुपयांवर नाशिक जिल्ह्यातून बांग्लादेशात सर्वाधिक टोमॅटो पाठवला जातो. यावर्षी मात्र बांग्लादेशने प्रतिकिलो १३ रुपयांचे आयात शुल्क ३३ रुपयांवर नेल्याने नाशिकच्या व्यापाऱ्यांना फटका बसला आहे. ------------------------------- १६-१ शिवपुरीतील टोमॅटोशी स्पर्धा मध्यप्रदेशातील शिवपुरी येथे दरवर्षी दिवाळीनंतर टोमॅटोचे पीक निघते. यंदा मात्र पाऊस कमी असल्याने नुकसान कमी झाल्यामुळे तेथील टोमॅटो दिवाळीपूर्वीच विक्रीसाठी तयार झाला. तेथून उत्तर प्रदेश आणि पंजाब जवळ असल्याने वाहतूक खर्च आवाक्यात असल्याने शिवपुरीच्या टोमॅटोला सर्वाधिक मागणी आहे. त्याचा थेट परिणाम नाशिक जिल्ह्यातील टोमॅटोच्या मागणीवर झाला आहे. -------- बंदरावरील प्रतीक्षा कालावधी खोरफक्कन बंदर : बर्थिंगसाठी प्रतीक्षा कालावधी अंदाजे २० ते २५ दिवस फुझेरा बंदर : बर्थिंगसाठी अंदाजे २० ते २५ दिवस जेबेल अली बंदर (थेट सेवा) : अंदाजे १० ते १२ दिवस ------------------- कोट अहेद शेख : NSK26H33762 यंदा पाऊस कमी असल्याने टोमॅटोचे नुकसान कमी झाले. लागवडीदेखील जास्त होत्या. त्यात युद्धामुळे अरब देशातील निर्यात १०० टक्के प्रभावित झाल्यामुळे नाशिकच्या टोमॅटोला मागणी कमी आहे. - अहेद मिनाज शेख, एस. आर. एक्सपोर्ट, पिंपळगाव बसवंत ------------------ संतोष ताकाटे : NSK26H33763 टोमॅटो कवडीमोल विक्री होत असल्याने उत्पादन खर्चही फिटणार नसल्याची स्थिती आहे. ऐन दुष्काळात ही परिस्थिती ओढवल्याने वर्षाचे आर्थिक गणित कसे जुळवावे, हा मोठा प्रश्‍न आहे. - संतोष ताकाटे, शेतकरी, कारसूळ (ता. निफाड) -------- शांताराम पाटील : NSK26H33764 दरवर्षी टोमॅटो विक्रीतून चांगला नफा मिळतो. यंदा मात्र घोर निराशा झाली. उत्पादन खर्च, वाहतूक खर्च आणि मजुरांना खिशातून पैसे देण्याची नामुष्की ओढवली आहे. - शांताराम पाटील, टोमॅटो उत्पादक, कादवा म्हाळुंगी (ता. दिंडोरी) -------- १६-१ सरासरी असा झाला खर्च (एकरी) मशागत : ७,००० ठिबक : १२,००० मल्चिंग पेपर : १०,००० रोप : ८,००० खते/ औषधे : १ लाख रुपये बांबू : २५,००० तार : १५,००० सुतळी : १२,००० बांधणी : १०,००० काढणी/ वाहतूक : ५०,००० -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com