Iranian Woman India Case
esakal
जळगाव : धरणगावात बेकायदा वास्तव्यास असलेल्या इराणी महिलेचे प्रकरण दिवसेंदिवस जटिल होत आहे. तिला अफगाणी तरुणाशी प्रेम झाले. त्याच्या शोधात ती भारतात आली. प्रेमाचे लग्नात रूपांतर झाले. ती गर्भवती राहिली. भारतात ‘रेफ्युजी’ असलेल्या तिच्या पतीचा खून झाला. इकडे तिने मुलाला जन्म दिला. आता मात्र तिच्या बाळासह देशात घेण्यास मूळ देश इराणने (Iranian Woman India Case) नकार दिला आहे. दुसरीकडे बाळाशिवाय जाण्याचा या आईचा प्रश्नच येत नाही.