कार्तिक मासात दररोज होणार दीपदान

कार्तिक मासात दररोज होणार दीपदान
Published on: 
फोटो : H33554 ‘इस्कॉन’ मध्ये वृंदावनाचे अनुपम भावविश्व सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२५ : द्वारका परिसरातील श्री श्री राधा मदन गोपाल (इस्कॉन) मंदिरात रविवारी (ता. २५) शरद पौर्णिमा महोत्सव उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात पार पडला. विशेष सोहळ्यानिमित्त मंदिरातील श्री राधा-कृष्णांच्या विग्रहांची मनमोहक आणि आकर्षक सजावट शुभ्र वस्त्र व विविध खड्यांच्या आभूषणांनी करण्यात आली होती. भगवान श्रीकृष्णांनी गोपींसमवेत केलेल्या रासलीलेची प्रतिकृती मंदिरात उभारली होती. यात चंद्र, विविध प्रकारची झाडे, वेली, फुलांचे ताटवे, निर्मळ सरोवर, वन्यजीव, पक्षी, ढग आणि पारंपरिक वाद्यांचे सुंदर भावविश्व साकारण्यात आले. चंद्राच्या शीतल प्रकाशात आणि भगवंतांच्या दिव्य दर्शनाने उपस्थित सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले. महोत्सवाची सुरुवात पहाटे ५ वाजता मंगल आरतीने झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्राचा विधिवत जप आणि दर्शन आरती झाली. त्यानंतर श्रीमद्भागवत प्रवचन झाले. सायंकाळी सातपासून भक्तिमय कीर्तनाला सुरुवात झाली व यानंतर इस्कॉनचे प्रवक्ते श्रीमान शिक्षाष्टकम् प्रभुजी यांचे विशेष प्रवचन झाले. प्रवचनानंतर विविध व्रज गीतांचे व भजनांचे गायन करण्यात आले. शरद पौर्णिमेचे मुख्य आकर्षण श्री दामोदर अष्टकमाचे गायन करण्यात आले व कार्तिक दीपदानाला सुरुवात करण्यात आली व सर्व उपस्थित भाविकांनी श्री दामोदरांना दीप अर्पण केले. शरद पौर्णिमेचे औचित्य साधून महिनाभरात दररोज ‘दामोदर अष्टकम’चे पठण करत भगवान श्री राधा-कृष्णांना दीप अर्पण केले जातील. या दीपोत्सवाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com