Sinnar Market Committee Election : ‘त्या’ 8 संस्थांचा मुद्दाच सिन्नर बाजार समितीत निर्णायक! वाजे गटाला लाभ

rajabhau vaje & Makirao Kokate
rajabhau vaje & Makirao Kokateesakal

दत्ता खुळे : सकाळ वृत्तसेवा

Sinnar Market Committee Election : सिन्नर बाजार समितीत निवडणूकीत आठ सहकारी संस्थांमधील ९६ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही अन्‌ हाच मुद्दा सहकारातील राजकारणाला कलाटणी देणारा ठरला.

माजी आमदार राजाभाऊ वाजे गटासाठी फायदेशीर ठरलेल्या या मुद्यामुळे आमदार माणिकराव कोकाटे यांनाही सत्ता राखता आलेली नाही. (issue of 8 institutions decisive in Sinnar Market Committee Election result Benefits to Waje Group nashik news)

संबंधीत आठ सहकारी संस्थांमधील सभासदांचा मुद्दा तब्बल दहा वर्षांपासून गाजत आहे. सिन्नर बाजार समिती निवडणुकीत कोकाटे व वाजे गटांनी समसमान जागा जिंकल्या. त्यात, सहकारी संस्थांच्या गटातील अकरापैकी आठ जागा कोकाटे गटाने व तीन जागा वाजे गटाने जिंकल्या.

मात्र, संबंधीत ९६ मतदारांना हक्क बजावता आला असता, तर चित्र कदाचित वेगळे राहिले असते, असे आता बोलले जात आहे. कारवाडी, गोंदे, पाटपिंप्री, पाथरे बुद्रुक, पंचाळे, बारागाव पिंप्री, मानोरी, विंचूर दळवी या आठ गावांतील या संस्था आहेत. अंतिम यादीत येथील ९६ मतदारांची नावे वगळली गेली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

rajabhau vaje & Makirao Kokate
Aviral Godavari: काँक्रिटीकरण काढण्यासाठी प्रतिष्ठेची लढाई नको; डॉ. राजेंद्रसिंह यांचे नाशिककरांना आवाहन

दहा वर्षे लढा

विशेष म्हणजे, मागील पंचवार्षिकमध्येही या आठ सोसायट्यांच्या सभासदांचा मुद्दा चर्चेत होता. मात्र, त्यावर न्यायालयाने तेव्हा निकाल दिलेला नव्हता. यामध्ये २०१३ ते २०१५ या कालावधीत वाजे गटाने सहकार विभाग ते न्यायालय असा लढा दिला.

त्यावर विकास संस्थेचे वर्गीकरण करता येणार नाही, असे न्यायालयाने बजावले. तर, २०२०मध्ये पुन्हा सहा संस्थांच्या वर्गीकरणासाठी कोकाटे गटाने सहकार विभागापासुन सुरवात केली. लढा पुन्हा न्यायालयात गेला असतानाच, निवडणुकही संपली अन्‌ निकालही जाहीर झाले. त्यामुळे या आठ संस्थांच्या वर्गीकरणाचा मुद्दा कायदेशीर प्रक्रियेत गाजत राहणारा आहे.

rajabhau vaje & Makirao Kokate
Dhule Market Committee Election : काँग्रेसप्रणीत शेतकरी पॅनल एकतर्फी विजयी; ‘रोडरोलर’ पंक्चर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com