नाशिक- बोधलेनगर येथील आंबेडकर वाडीत जाधव बंधूंच्या खून प्रकरणातील संशयित पाच महिलासह सहा जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक रोड सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपासी पथकाने (एसआयटी) केला असून, सुमारे दीड हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.