(टीप – सदरची बातमी जाहिरातदार संस्थेचे आहे. फोटोसह वापरावी ही विनंती)
फोटो-22938
शहा ः एस. जी. जाधव स्कूलच्या खेळाडूंसमवेत संभाजी जाधव, शुभांगी जाधव, अतुल निळकंठ, निवृत्ती मुरडनर आदी.
जाधव विद्यालयातील खेळाडूंची
विभागीय स्तरासाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. ३ ः शहा येथील एस. डी. जाधव इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश मिळविले. खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे शैक्षणिक वर्तुळातून स्वागत होत आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा नुकत्याच झाल्या. यात एस. डी. जाधव इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले. १७ वर्षांखालील वयोगटात तलवारबाजी स्पर्धेत सम्राज्ञी जाधव हिने नेत्रदीपक यश मिळविले. तिची नंदुरबार येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली. बॉक्सिंग स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात ऋत्विज खैरनारने विजेतेपद पटकावले. त्याची शिरपूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली.
बॉक्सिग स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात साई कुलकर्णी तृतीय, आदित्य पोलगर तृतीय, तर १४ वर्षांखालील मुलांच्या गटात रौनक क्षत्रिय तृतीय आला. संस्थेचे अध्यक्ष संभाजी जाधव, उपाध्यक्षा शुभांगी जाधव, प्राचार्य अतुल निळकंठ, क्रीडाशिक्षक निवृत्ती मुरडनर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव केला.
........