इगतपुरी- इगतपुरी तालुक्यात शेतीला जोड धंदा म्हणून दुग्धव्यवसाय केला जातो. मात्र चाऱ्याअभावी दुग्धव्यवसाय संकटात येत आहे. त्यावर पर्याय म्हणून मका उत्पन्नासाठी मका न घेता केवळ चाऱ्यासाठी मक्याची शेतीचा प्रयोग शेणित येथील गोकूळ जाधव यांनी केला आहे. सुमारे बारा एकरात त्यांनी चाऱ्याच्या मका पेरला आहे.