जगदंबा बिगरशेती पतसंस्थेस
४१ लाख ५५ हजारांचा नफा
--------------
दहा टक्के लाभांशाची घोषणा
----------
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता.२ ः येथील जगदंबा बिगरशेती सहकारी पतसंस्थेला २०२५- २०२६ या आर्थिक वर्षात विक्रमी ४१ लाख ५५ हजार रुपयांचा नफा झाल्याची माहिती देत संस्थेचे अध्यक्ष अकबर मणियार व कार्यकारी संचालक अल्केश खाबिया यांनी दहा टक्के लाभांश जाहीर केला.
--------------
पतसंस्थेची सभासद संख्या ८७० इतकी असून वसूल भाग भांडवल ४१ लाख ३१ हजार रुपये आहे. स्वनिधी ३ कोटी ४४ लाख इतका आहे. संस्थेकडे १४ कोटी २३ लाखांच्या ठेवी आहेत. संस्थेने एकूण ११ कोटी १७ लाखा रुपयांचे कर्ज वितरित केलेले आहे. ७ कोटी १३ लाख रुपयांची नियमानुसार गुंतवणूक केल्याची माहिती व्यवस्थापक संजय चित्ते यांनी अहवाल वाचनप्रसंगी दिली. संस्थेच्या प्रगतीत प्रत्येक सभासदाचा सहभाग तितकाच महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन कार्यकारी संचालक अल्केश खाबिया यांनी केले. ॲड. फरहाद पठाण, दिगंबर पाटोळे यांनी मनोगत व्यक्त करीत पतसंस्थेला शुभेच्छा दिल्या. पतसंस्थेचे चेअरमन सचिन खबिया, प्रकाश कड, उपाध्यक्ष विजय गणोरे, बाळासाहेब पुरकर यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. नरेंद्र मोर यांनी सूत्रसंचालन केले.
--------------