YEO26B27240
कोटमगाव : होमपूजा करताना श्री. व सौ. योगेश सावंत.
----------------------
३०-२
कोटमगावात मंत्रोच्चारांनी
जगदंबा मातेची होमपूजा
---------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१९ : श्रीक्षेत्र कोटमगाव खुर्द येथे श्री जगदंबा माता नवरात्र उत्सवानिमित्त ग्रामदैवत मंदिरात होमपूजेचा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. भाविकांनी होमपूजा करत नारळ अर्पण करून दर्शनासाठी गर्दी केली होती.
देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची गर्दी उसळली होती. मुंबईचे उद्योजक श्री. व सौ. योगेश सावंत यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने विशेष होमपूजा करण्यात आली. देवीभक्त आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले.
होमपूजेवेळी झालेल्या मंत्रोच्चारांनी आणि जगदंबा मातेच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक सोहळ्यात भाविकांनी श्रद्धेने सहभाग घेतला. पूजेनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. होम पेटवल्यानंतर यात्रेचा समारोप झाला. संस्थानचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, उपाध्यक्ष भाऊसाहेब आदमाने, सचिव दिलीप कोटमे, खजिनदार रामदास भोसले, विश्वस्त अंबादास लहरे, गणेश कोटमे, शंकर कोटमे, लहानू धांद्रे, शुभदा दाणी, शैला कलंत्री व सुमन कोटमे, राजेंद्र कोटमे आदी उपस्थित होते.
------------------