जगदंबा मातेचा जयघोष करीत तीस हजार भाविक नतमस्तक फुलांची आकर्षक सजावट अन् देवीचा साजशृंगार; पालख्या व पदयात्रांमुळे वणीत भक्तिमय वातावरण

जगदंबा मातेचा जयघोष करीत तीस हजार भाविक नतमस्तक  फुलांची आकर्षक सजावट अन् देवीचा साजशृंगार; पालख्या व पदयात्रांमुळे वणीत भक्तिमय वातावरण
Published on: 
पान-२ साठी VNI26B13266 वणी ः जगदंबा माता मंदिर परिसरात भाविकांची झालेली गर्दी. -------------------- ३६-३ जगदंबेच्या दर्शनास भाविकांची गर्दी -------------- सलग सुटीमुळे तब्बल तीस हजारावर नागरिक नतमस्तक, -------------- सकाळ वृत्तसेवा वणी, ता.१९ : ‘जय जगदंबे’च्या जयघोषाने दुमदुमलेला मंदिर परिसर, दर्शनासाठी भाविकांच्या रांगा अशा भक्तिमय वातावरणात येथील श्री जगदंबा मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवातील सप्तमी उत्साहात साजरी झाली. शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस सप्तमीचा योग आल्याने वणीतील जगदंबा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. सुमारे तीस हजार भाविकांनी जगदंबेच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. ----------------- नवरात्रोत्सवानिमित्त जगदंबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सप्तमीच्या मुहूर्तावर नाशिक जिल्ह्यासह अहिल्यानगर आणि गुजरातमधून पालख्या व पदयात्रांद्वारे भाविक वणीत दाखल झाले होते. जगदंबा मातेचे दर्शन घेऊन तसेच पालखी भेटीचा लाभ घेऊन हे भाविक पुढे सप्तशृंगगडाकडे मार्गस्थ होत होते. सप्तमीनिमित्त जगदंबा मंदिरात आकर्षक फुलमाळांची सजावट करण्यात आली होती. सकाळी सातला देवीची पंचामृत महापूजा करण्यात आली. जगदंबा मातेला जांभळ्या रंगाची पैठणी नेसविण्यात आली. डोक्यावर चांदीची छत्री व मुकुट, कानात चांदीची कर्णफुले, नाकात मोतीजडित सोन्याची नथ, गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र आणि चांदीची पदकमाळ परिधान करून देवीचा साजशृंगार करण्यात आला. ट्रस्टतर्फे नवरात्रोत्सवात दररोज विविध ठिकाणच्या भजनी मंडळांचे जागरण-गोंधळ, भजन व संगीत कार्यक्रम होत होते. देवीच्या भक्तिगितांनी मंदिर परिसर दुमदुमून जात होता. ----------------- चौकट करणे VNI26B13263 वणी ः जगदंबा माता मंदिरात घटी बसलेल्या महिलांची आरोग्य तपासणीसाठी लागलेली रांग व शिबिरात सहभागी आरोग्य पथक.. ------------------- भाविक, महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर वणी : श्री जगदंबा माता मंदिरात घटी बसलेल्या महिला तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत दिंडोरीच्या महासाईसिद्धी मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि श्री जगदंबा देवी ट्रस्टतर्फे मोफत सर्वरोग निदान शिबिर झाले. सुमारे साडेतीनशे महिला व भाविकांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले. गेल्या अकरा वर्षांपासून हा आरोग्यसेवेचा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिबिराचे उद्‌घाटन श्री जगदंबा देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, उपाध्यक्ष मनोज थोरात, विश्वस्त गणेश देशमुख, पोपटराव थोरात, प्रवीण देशमुख, राकेश थोरात, रोशन जहागीरदार, रवींद्र थोरात, सुरेश देशमुख, रमेश देशमुख आदींच्या उपस्थितीत झाले. महासाईसिद्धी हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत पिंगळ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गौरी पिंगळ यांनी करीत आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि वैद्यकीय सल्ला दिला. डॉक्टर व आरोग्य पथकाचा श्री जगदंबा देवी ट्रस्टतर्फे सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com