जळगाव जिल्हा बँक निवडणूक (लोगो)
-----
सहकार विरुद्ध शेतकरी पॅनलमध्ये लढत
---
नऊ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात; उमेदवारांना चिन्हवाटप
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांना बुधवारी (ता. १८) चिन्हवाटप करण्यात आले. आता महायुतीचे सहकार विरुद्ध काँग्रेस-शेतकरी संघटनेच्या शेतकरी पॅनलमध्ये लढत होणार आहे. २१ पैकी १२ जागा माघारीवेळी बिनविरोध झाल्या आहेत. आता नऊ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात आहेत.
मंगळवारी (ता. १७) माघारीच्या शेवटच्या दिवसअखेर १२ उमेदवार बिनविरोध झाले. बिनविरोध झालेल्या उमेदवारांमध्ये मंत्रिद्वयी गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह दिग्गजांचा समावेश आहे.
निवडणुकीत भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची महायुती झाली आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न झाले, पण तसे होऊ शकले नाही. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल केला असून, त्या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्याची उमेदवारी कायम राहिली, तर चाळीसगावातही आमदार मंगेश चव्हाणांविरोधात उमेदवारी कायम आहे. अन्य सात जागांवरही इतर उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे नऊ जागांवर होणाऱ्या लढतींमध्ये चुरस पाहायला मिळेल.
----
तालुकानिहाय रिंगणातील उमेदवार व कंसात चिन्ह
यावल : प्रशांत लीलाधर चौधरी (ट्रॅक्टर), गणेश गिरधर नेहते (नारळ), रामदास गोंडू पाटील (छत्री), विनोदकुमार पंडितराव पाटील (कपबशी), रावेर : राजेंद्र पंढरीनाथ चौधरी (कपबशी), योगीराज गबाजी पाटील (ट्रॅक्टर), महेश नारायण पाटील (शिट्टी), चाळीसगाव : आमदार मंगेश रमेश चव्हाण (कपबशी), नारायण नथू पाटील (एअर कंडिशनर), विजय पाटील (पोळपाट लाटणे), मुक्ताईनगर : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे (कपबशी), देवयानी चंद्रकांत देशमुख (ऑटो रिक्षा), महिला प्रतिनिधी : माधुरी चंद्रशेखर अत्तरदे (कपबशी), ज्योती नाना पाटील (ट्रॅक्टर), पूनम प्रशांत पाटील (कपबशी), सुलोचना भगवान पाटील (ट्रॅक्टर), इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : सुनील प्रकाश देवरे (ट्रॅक्टर), अनिल वसंत पाटील (बॅट), कुलभूषण पाटील (चष्मा), चंद्रकांत बाविस्कर (कपबशी), विमुक्त जाती-भटक्या जमाती-विशेष मागास प्रवर्ग : अंबादास मधुकर गोसावी (नगारा), काशीनाथ देवराम जावरे (बोट), सुरेश पुना धनके (कपबशी), मोरसिंग राठोड (टेबल), विकास ज्ञानेश्वर वाघ (ट्रॅक्टर), इतर सहकारी संस्था : खिलचंद सुरेश इंगळे (रबरी शिक्का), प्रशांत लीलाधर चौधरी (ट्रॅक्टर), विशाल गुलाबराव देवकर (कपबशी), विकास नारखेडे (फलंदाज).