नाशिक- जेल रोड येथील अमृत उद्यान समस्यांच्या विळख्यात अडकले असून, नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरांमधील इतर जॉगिंग ट्रॅकमध्ये ज्या सुविधा पुरविल्या आहेत, तशाच प्रकारच्या सुविधा अमृत उद्यानात पुरविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे..कृषीनगर, गोल्फ क्लब, इंदिरानगर या जॉगिंग ट्रॅकमध्ये सीसीटीव्ही, म्युझिक सिस्टीम, पिण्याच्या पाण्याची सोय अशा सुविधा अमृत गार्डनमध्येही बसविण्याची आवश्यकता आहे. जेल रोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालयाच्या मागे अमृत गार्डन नाशिक मनपाने नऊ एकरात उभारले आहे. नाशिक रोड भागातील हे सर्वात उद्यान आहे. .वन उद्यानाच्या संकल्पनेवर आधारित या उद्यानात अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहे. उद्यानातील जॉगिंग ट्रॅक योग्यरीत्या समपातळीत बनविलेला नाही. त्यामधील दगड बाहेर येऊन नागरिकांना पायी चालताना अडचणी होत आहे. तसेच दगडामध्ये पाय अडकून जखमी होण्याची शक्यता आहे. अमृत उद्यानामध्ये पाण्याची व्यवस्था नाही..ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने अनेक ठिकाणी विरंगुळा केंद्राची स्थापना केली आहे, ते विरंगुळा केंद्र उभारले जावे अशीही नागरिकांनी मागणी केली आहे. सुरक्षारक्षक कायमस्वरूपी नेमणूक करण्याची गरज आहे. यामुळे टवाळखोर व मद्यपींना आळा बसेल. या गार्डनमध्ये प्रेमीयुगुलही येऊन बसतात. त्यामुळे येथे सीसीटीव्ही बसविल्यास या बाबींना आळा बसेल..अमृत उद्यानातील कुंपणाचे काम पूर्ण झाले आहे. नवीनच ग्रीन जीन बसविण्यात आली आहे. उद्यानातील फुटपाथच्या कामास मंजुरी मिळालेली आहे, लवकरच काम सुरू होईल.- रंजना बोराडे, माजी नगरसेविका.नाशिक रोड भागातील हे सर्वांत मोठे उद्यान आहे. देखभाल व दुरुस्तीची नियमित आवश्यकता आहे. गोल्फ क्लब, कृषीनगर या जॉगिंग ट्रॅकच्या धर्तीवर म्युझिक सिस्टिम, सीसीटीव्ही बसवावेत.- मदन केदारे, अध्यक्ष अमृत उद्यान सेवाभावी संस्था.परिसरातील शेकडो नागरिक व्यायामासाठी नियमितपणे अमृत उद्यानात येतात. पूर्ण वेळ सुरक्षारक्षकाची आवश्यकता आहे. जेणेकरून मद्यपी व टवाळखोरांचा वावर राहणार नाही. तसेच, अनुचित प्रकार टाळता येतील.- रंगनाथ दराडे, माजी पोलिस अधिकारी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.