जिल्‍हा कारागृहात कैद्यांमध्ये घमासान

जिल्‍हा कारागृहात कैद्यांमध्ये घमासान
Published on: 
सेकंडमेन ----------- जिल्‍हा कारागृहात कैद्यांमध्येच घमासान ---------- भाजी मागणाऱ्या कैद्याचा दात तोडला; चार दिवसांनंतर चौघांवर गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ८ : येथील जिल्‍हा कारागृहात जेवण वाटपादरम्यान भाजी मागितल्याने आकाश भानुदास गोरखा (वय २९, रा. कवाडेनगर, भुसावळ) या बंदीवानाला बॅरेकमधील चौघा बंदिवान कैद्यांनी जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी(ता.३) घडली. या मारहाणीत जखमी आकाशचा एक दात तुटला आहे. याप्रकरणी शनिवारी(ता.७) जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चार बंद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ शहर पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात आकाश गोरखा हा जिल्हा कारागृहात आहे. मंगळवारी(ता.३) रात्री सर्कल क्रमांक तीनमधील बॅरेक १३मध्ये जेवण वाटप सुरू असताना बंदी आकाश गोरखा याने जेवण वाटप करणाऱ्या हर्षल नाना गुरव (वय २४, रा. पिळोदा, ता.अमळनेर) याला भाजी मागितली. त्याचा त्याला राग आल्याने त्याने आकाशला शिवीगाळ करुन कानशिलात मारली. बंदी वीरेंद्रसिंग उर्फ विक्की गोविंदसिंग तोमर (३६, रा. टाकळी, ता.चाळीसगाव) याने आकाशची मान पकडून त्याला जमिनीवर पाडले, तर सागर रमेश कोळी (३०, रा. साकेगाव, ता.भुसावळ), धनंजय उर्फ धीरज दत्तू कोळी (२२, रा. पाळधी) या दोघांनी मारहाण केली. या मारहाणीत त्याचा दाट तुटून दुखापत झाली. ...अखेर गुन्हा दाखल बॅरेकचे कुलूप बंद असताना चौघांनी मिळून आकाशला मारहाण केली. त्यावेळी तेथे कर्मचारी आले व त्यांनी सुटका केली. या चारही जणांकडून जिवे मारण्याची शक्यता होती, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी आकाश गोरखा याने जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हर्षल गुरव, वीरेंद्रसिंग तोमर, सागर कोळी, धनंजय कोळी या चार बंद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.