
Nashik : तुरुंगाधिकाऱ्यावरच आली कैदी होण्याची वेळ
नाशिक : नाशिक राेड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भाेगणाऱ्या तिघा कैद्यांकडून लाखाे रुपये घेत त्यांना शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी बेकायदेशीर कारागृहाबाहेर सोडल्याप्रकरणी दोघा तुरुंगाधिकाऱ्यांसह एक लिपिकाविरोधात नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल आहे. अटकपूर्व जामीन फेटाळल्याने दोघे नाशिक रोड न्यायालयासमोर हजर झाल्याने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.
ज्या कारागृहात तुरुंगाधिकारी राहिलेल्या अधिकाऱ्यावर त्याच कारागृहात कैदी म्हणून जाण्याची वेळ आल्याची चर्चा कारागृह परिसरात रंगली. (jailer arrested for taking bribe from prisoner to make them free Nashik Latest Marathi News)
हेही वाचा: Nashik : प्लॅस्टिक फुले विक्रीचा मुद्दा राष्ट्रीय हरित लवादासमोर
दरम्यान, या गुन्ह्यातील तिसऱ्या संशयित लिपिकाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. २०१७ मध्ये नाशिक रोड कारागृहात कार्यरत तुरुंगाधिकारी संशयित श्यामराव अश्रुबा गिते, माधव कामाजी खैरगे व वरिष्ठ लिपिक सुरेश जयराम डबेराव यांनी नाशिक राेड मध्यवर्ती कारागृहात तीन कैद्यांना शिक्षेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच लाच घेऊन कारागृहातून बेकायदेशीर सोडले.
ही बाब कारागृह प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर कारागृह महासंचालकांनी अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात दोषी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तुरुंगाधिकारी सतीश गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार, एप्रिलमध्ये नाशिक राेड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हाेता. शिक्षा भाेगणाऱ्या कैदी व त्यांच्या नातलगांकडून लाच घेऊन कैद्यांच्या शिक्षा कमी करून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात कागदाेपत्री खाडाखाेड करून मुक्त किंवा शिक्षा कमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, दाेघेही तुरुंगाधिकारी अटकपूर्व जामिन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात गेले हाेते. मात्र, जामीन नाकारल्याने दाेघेही नाशिक रोड न्यायालयाला शरण आले. त्यानंतर न्यायालयाने दाेघांची न्यायालयीन काेठडीत रवानगी केली. उपनिरीक्षक आर. एस. मुंतोडे तपास करीत आहेत.
हेही वाचा: Navratrotsav 2022 | पहिली माळ : ग्रामदैवत श्री भद्रकालीदेवी मंदिर