पत्रकारपत्रकार परिषदपत्रकार परिषद परिषद

पत्रकारपत्रकार परिषदपत्रकार परिषद परिषद
Published on: 
ही बातमी व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षाची बातमीजवळ जवळ लावावी. ------ ‘जलजीवन’मधील गैरव्यवहार बाहेर येण्याची पाणीपुरवठा मंत्र्यांना भीती ----------- पाणीटंचाईवर नियोजन जाहीर करण्याचे आवाहन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १० : राज्यात जलजीवन मिशनची कामे अपूर्ण असून, त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केला. हा गैरव्यवहार उघड होऊ नये, अशी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांना भीती आहे. त्यामुळेच ते आपण दुष्काळी भागाचा दौरा का करीत आहात ?असा प्रश्न उपस्थित करीत असल्याचा टोला सपकाळ यांनी लगावला. राज्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. शासन शेतकऱ्यांना मदत देण्याची तयारी करीत आहे. असे असताना शनिवारी (ता.१०) कॉंग्रेसचे प्रदेशााध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दुष्काळी भागाचा दौरा का करीत आहेत, अशी टिका पालकमंत्री पाटील यांनी केली होती. त्यावर सपकाळ बोलत होते. आम्ही प्रत्यक्ष गावात भेटून दुष्काळाची माहिती घेत आहोत. शेतकरी, नागरिकांशी संवाद साधत आहोत. यातून अनेक गावात जलजीवन मिशनची कामे अपूर्ण असून कामे बंद असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात या योजनेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रार असल्याचा आरोपही श्री. सपकाळ यांनी केला. पाणीपुरवठा मंत्र्यांनी आम्ही दुष्काळी भागाचा दौरा का करीत आहेत, हे विचारण्यापेक्षा जिल्ह्यातील पाणीटंर्चाइचा आराखडा जाहीर करावा. जलजीवन मिशनमधील कामांची श्‍वेतपत्रिका काढावी, आपला लाडका ठेकेदार योजनेचे काय झाले ते जाहीर करावे, असे आव्हान श्री. सपकाळ यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com