सिन्नर- दोन ते तीन वर्षे होऊनही जलजीवनची कामे अपूर्ण आहेत. त्यांना मुदतवाढ देऊ नये. कामे अपूर्ण ठेवल्याने ठेकेदारांवर कारवाई करावी, असे आदेश कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले. येथील अण्णा भाऊ साठे नाट्यमंदिरात झालेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.