येवला- जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांना अखेर सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यामुळे गरजेइतका वाढीव निधी उपलब्ध होणार आहे. परिणामी, या योजनांना आता वेग मिळणार असून लवकरच संबंधित गावांतील नागरिकांना मुबलक स्वरूपात पाणी पुरवठा होणार आहे.