शहरात अवघ्या ६ तासांत
घरफोडी गुन्हा उघडकीस
चोरट्याला २८ हजारांचा मुद्देमालासह अटक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : शहरात घरफोडीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली असून, शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या सहा तासातच गुन्ह्याची उकल केली आहे. या गुन्ह्यात संशयिताकडून पोलिसांनी २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरातील निसार कॉलनीतील (प्लॉट क्रमांक २७/२) येथील रहिवासी शेख अनिस शेख चाँद (वय ३५) यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने १७ हजार रुपये किमतीचे चांदीचे पायतळ, ८ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन पोती आणि २९ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण मुदमेमाल लांबविला होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यात निरीक्षक सागर शिंपी यांच्या पथकाने गुप्त बातमीदाराच्या माहितीवरुन सराईत गुन्हेगार असमत खाँ इलियास खाँ कुरेशी (रा.गेंदालाल मिल, जळगाव) याने ही चोरी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसरातून संशयितास ताब्यात घेतले. सुरुवातीला तो चालवाढलची उत्तरे देत असला तरी, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली.