वाचन संस्कृती वृद्धिंगत करणारा जळगावात इतिहास घडणार १ लाख पुस्तकांमधून प्रत्येक वाचकाला मोफत पुस्तक मिळणार

वाचन संस्कृती वृद्धिंगत करणारा जळगावात इतिहास घडणार            
१ लाख पुस्तकांमधून प्रत्येक वाचकाला मोफत पुस्तक मिळणार
Published on: 
लाख पुस्तकांमधून प्रत्येकाला मोफत पुस्तक वाचन संस्कृती वृद्धिंगत जपण्यासाठी जळगावात अनोखा उपक्रम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : येथील व. वा. जिल्हा वाचनालय आणि डोंबिवली येथील पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यामाने उत्तर महाराष्ट्रात प्रथमच जळगाव येथे बुक स्ट्रीट उपक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती वाचनालयाचे कार्याध्यक्ष सी.ए. अनिलकुमार शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली. काव्यरत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानासमोरील रस्त्यावर रविवारी (ता. १५) पहाटे ५ ते दुपारी ११ या वेळेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात मिश्र स्वरूपातील व विविध भाषेतील सुमारे एक लाख पुस्तकांची रस्त्यावर मांडणी करण्यात येणार असून तेथे भेट देणाऱ्या प्रत्येक वाचकाला एक पुस्तक मोफत मिळणार आहे. डोंबिवली, पुणे, ठाणे यानंतर जळगावात वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने व. वा. जिल्हा वाचनालयाच्या १५० वर्षानिमित्त या बुक स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमास शहर महापालिका, पोलिस विभाग व शहर वाहतूक विभागाचे सहकार्य लाभत आहे. पत्रकार परिषदेला पै फ्रेंड्स लायब्ररी डोंबिवलीचे अमेय घेसास, हेमंतकुमार नेहेते, संकेत पै, सिद्धार्थ सामंत, वाचनालयाच्या सचिव प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी, महिला समिती प्रमुख संगीता अट्रॉवलकर, ग्रंथपाल अनिल अत्रे यांची उपस्थिती होती. संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा आणि इतिहास घडवावा, असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.