शहर-जिल्हा कॉमन
NSK26H30826
जळगाव : विजयी खेळाडूंसोबत गणेश लोडते, दत्तात्रेय कानडे, चंद्रशेखर नरवरिया, अताऊल्लाह खान, मंजूर खान, दिगंबर पाटील, रंगनाथ पाटील, नाटुबा जाधव, रघुनाथ पाटील आदी.
––––––––
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता
(उपशीर्षक)
जिल्ह्यातील ६४ खेळाडूंचा सहभाग; नईम अन्सारी उपविजयी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ११ : जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व तोंडापूर कॅरम प्रेमीतर्फे कासम शेख स्मृती जिल्हा मानांकन पुरुष एकेरी कॅरम स्पर्धा नुकतीच झाली. यात तमन्ना क्रीडा संस्थेचा रईस शेख याने जैन स्पोर्ट्स अकॅडमी जळगावच्या नईम अन्सारीचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद प्राप्त केले.
या स्पर्धेत जिल्ह्यातील ६४ खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेत एकूण तीन खेळाडूंनी ओपन टू फिनिशची नोंद केली. त्यात वसीम शेख (जामनेर), नईम अन्सारी (जळगाव), दानिश शेख (भुसावळ) यांचा समावेश होता. प्रमुख पंच म्हणून गणेश लोडते, सहायक प्रमुख पंच म्हणून चंद्रशेखर नरवरिया, बोर्ड पंच म्हणून साकिब अन्सारी, जैद शेख, सय्यद जुनेद, संतोष हायलिंग, बबलू अन्सारी, इतर खेळाडू, बंडू कलाल व सलीम पटेल यांनी सहकार्य केले. स्पर्धेचा विजेता रईस शेख याला रोख चार हजार रुपये व चषक, नईम अन्सारीला रोख तीन हजार रुपये व चषक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत भुसावळ येथील दानिश शेख याने तृतीय क्रमांक व जळगाव येथील सय्यद मोहसिन याने चतुर्थ क्रमांक पटकाविला. आसीम शेख (जामनेर), वसीम खान (जळगाव), आरिफ शेख (जामनेर) व फिरोज खान (जळगाव) यांनी अनुक्रमे पाच ते आठ क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. पारितोषिक वितरणप्रसंगी जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील, महाराष्ट्र राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष मंजूर खान, आयोजक रंगनाथ पाटील, दत्तात्रेय कानडे, चंदू जोशी, रघुनाथ पाटील, नाटूबा जाधव, दीपक पाटील, आबा पाटील, नाना पाटील, फिरोज खान आदींची उपस्थिती होती.