टुडे पान ३ : मेन फिचर
NSK26H33753
जळगाव : हरिविठ्ठलनगर व श्यामनगर दरम्यान मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण व समस्यांची पाहणी करताना महापौर दीपमाला काळे. सोबत नगरसेवक पीयूष कोल्हे, संतोष चौधरी, नगरसेविका डॉ. अमृता सोनवणे व महापालिकेचे अधिकारी.
----
स्वच्छतेसह रस्त्यातील अतिक्रमणे तातडीने काढा
प्रभाग ११ मध्ये महापौरांची पाहणी; मांसविक्री दुकानांच्या परवान्यांची तपासणीचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २८ : शहरातील स्वच्छता व्यवस्था सुधारण्यासह नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी बुधवारी (ता. २८) प्रभाग क्रमांक ११ मध्ये पाहणी दौरा केला. ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियानां’तर्गत रामानंद नगर, श्याम नगर आणि वाघ नगर परिसरातील विविध ठिकाणांना भेट देत त्यांनी स्वच्छता, पथदीप, पाणीवापर आणि मांसविक्री दुकानांबाबतच्या तक्रारींची दखल घेतली. संबंधित विभागांनी प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
रामानंदनगर बसथांबा आणि घाट परिसरात वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी केली. महापौरांनी जुन्या पथदिव्यांची तपासणी करून बदलण्यास सांगितले. स्वच्छतेसाठी सफाई कामगारांना रोटेशन पद्धतीने काम देण्यासह कचरा संकलनासाठी बीव्हीजी कंपनीची वाहन उपलब्ध करून घेण्यावर भर देण्यात आला. तसेच पाहणी दरम्यान नगरसेविका डॉ. अमृता सोनवणे, संतोष पाटील, नगरसेवक पीयूष कोल्हे यांच्यासह आरोग्य, बांधकाम, अतिक्रमण, पाणीपुरवठा आणि विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शौचालय हटव
हरिविठ्ठल नगरातील भिल गल्ली येथील सार्वजनिक शौचालयाजवळील रहिवाश्यांनी दुर्गंधीच्या त्रासाबाबत महापौरांकडे तक्रार केली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत या परिसरातील नागरिकांनी अनुदान घेतले असताना सार्वजनिक शौचालय कशासाठी, असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला. तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना हे शौचालय हटविण्याच्या सूचना दिल्या.
झोपड्यांचे अतिक्रमण काढा
श्याम नगर ते हरीविठ्ठल नगरला जोडणारा १२ मिटरच्या मुख्य रस्त्यात झोपड्यांचे अतिक्रमण असल्याचे महापौरांनी पाहणी दरम्यान आढळून आले. यावेळी महापौरांनी बांधकाम विभागाला रस्त्याची मोजणी करणे, भूमिगत गटारींचे काम प्रामुख्याने हाती घेऊन रस्त्याचे कामांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. तर अतिक्रमण निर्मूलन विभागाला या मुख्य रस्त्यातील अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या.
चौकट
स्वच्छतेचे नियम पाळा
वाघनगरमधील मांसविक्री दुकानांबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींची महापौरांनी दखल घेत वाघनगर येथे पाहणी केली. यावेळी दुकानांचे परवाने तपासून स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याबाबत सक्त सूचना दिल्या.