NSK26H31334
जळगाव : माहेश्वरी युवक संघटनेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय खेल महोत्सवात सहभागी खेळाडू व मान्यवर.
जिल्हास्तरीय खेल महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
माहेश्वरी युवक संघटनेतर्फे आयोजन; पाच क्रीडा प्रकारांत १३० खेळाडूंचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : शहर माहेश्वरी युवक संघटनेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय खेल महोत्सव- २०२६ उत्साहात झाला. २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान व. वा. वाचनालय येथे झालेल्या या तीन दिवसीय महोत्सवात माहेश्वरी समाजातील १३० खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अक्षय लढ्ढा, सचिव सुरज सोमाणी, खेलकूद मंत्री मयूर धुप्पड, प्रमुख अतिथी आयूष मणियार, पीयूष मणियार, राधेश्याम कोगटा, मनीष झवर, अंजनीकुमार मुंदडा, जिल्हाध्यक्ष तेजस देपुरा, जिल्हा महिला अध्यक्ष उषा कासट, शहराध्यक्ष गिरीश झवर, शहर महिला अध्यक्ष अरुणा मंत्री आदी उपस्थित होते. महोत्सवात टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ आणि पिकलबॉल या पाच क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेत कौशल्याचे प्रदर्शन केले. युवकांमधील क्रीडागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, शिस्त, संघभावना आणि निरोगी स्पर्धेची भावना वाढविणे हा महोत्सवाचा उद्देश होता. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी प्रकल्प प्रमुख पारस झवर, रुचिता भुतडा, सहप्रकल्प प्रमुख संतोष झवर, युक्ता लखोटिया, अनिमेष मुंदडा, हर्षल लढ्ढा यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.