दिव्यांच्या रोषणाईसोबत उजळला माणुसकीचा दीप

दिव्यांच्या रोषणाईसोबत उजळला माणुसकीचा दीप
Published on: 
ॲंकर (संबंधित संग्रहित छायाचित्र किंवा स्केच वापरावे) --- शीर्षक दिव्यांच्या रोषणाईसोबत उजळला माणुसकीचा दीप सांस्कृतिक मैफली ते वंचितांच्या आनंदोत्सवापर्यंत दिवाळीचा उत्साह भूषण श्रीखंडे : सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई, फराळाचा गोडवा, नात्यांमधील स्नेह आणि आनंदाची उधळण... पण या सणाचा खरा आनंद केवळ आपल्या घरापुरता मर्यादित न ठेवता तो गरजूंच्या आयुष्यातही पोहोचविण्याचा प्रयत्न जळगावकरांकडून होत आहे. शहरात एकीकडे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मैफली रंगत आहेत, तर दुसरीकडे वंचित मुले, आदिवासी बांधव, शेतकरी आणि गरीब कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी विविध सामाजिक संस्था, सेवाभावी संघटना आणि लोकप्रतिनिधी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे यंदाच्या दीपोत्सवात रोषणाईसोबतच माणुसकीचा प्रकाशही उजळणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने जळगाव शहरात सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम आहे. विशेषतः दिवाळी पाडव्याच्या पहाटे होणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमांना रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. चांदोरकर चॅरिटेबल ट्रस्ट दरवर्षी महात्मा उद्यानात पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच संस्कार भारतीतर्फे महापालिकेच्या आवारात भक्तिगीतांची मैफल रंगणार आहे. शहरातील विविध भागांत तसेच ज्येष्ठ नागरिक संघात देखील पाडवा पहाटेच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वंचितांचा आनंदोत्सव दिवाळीचा आनंद समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने अनेक संस्था सामाजिक उपक्रम राबवितात. दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे दीपोत्सव पूजनाचा कार्यक्रम घेतला जातो. नोबेल फाउंडेशनचे कार्यकर्ते ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यांवर जाऊन गरजू मुलांसोबत दिवाळी साजरी करतात. तर भरारी फाउंडेशनतर्फे शेतकऱ्यांना दिवाळी फराळासह बियाण्यांचे वाटप केले जाते. लोकप्रतिनिधींकडूनही सामाजिक बांधिलकी जपली जाते. आमदार सुरेश भोळे शहरातील भिल्ल वस्ती आणि गरीब वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांसोबत दिवाळी साजरी करतात. मंत्री गिरीश महाजन हे आदिवासी पाड्यांवर जाऊन आदिवासी बांधवांसोबत सणाचा आनंद वाटून घेतात. चौकट सामाजिक संस्थांचाही पुढाकार रोटरी क्लब तसेच शहरातील अन्य सामाजिक आणि सेवाभावी क्लबचे सदस्यही दिवाळीनिमित्त विविध उपक्रम राबवितात. गरजू कुटुंबांना फराळ, मिठाई आणि आवश्यक वस्तूंचे वाटप, मुलांसोबत आनंदाचे क्षण, तसेच समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचे काम केले जाते. विविध सामाजिक संस्था आणि मित्रमंडळांकडूनही अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.