दिवाळीतही शहरातील पाच हजार पथदिवे राहणार बंदच

दिवाळीतही शहरातील पाच हजार पथदिवे राहणार बंदच
Published on: 
टुडे एक : मेन फिचर (पथदिव्यांचे संग्रहित छायाचित्र वापरावे) ---- दिवाळीतही पाच हजार पथदीप राहणार बंदच नव्या पथदीपांसाठी एजन्सीसोबतचा करार रखडला; बसविण्याची प्रक्रिया लांबणीवर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २८ : दिवाळीच्या सणानिमित्त शहरातील बाजारपेठा आणि रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ वाढली असताना, शहरातील अनेक भागांमध्ये पथदीप बंद असल्याने अंधाराचे सावट कायम आहे. शहरातील सुमारे २५ हजार पथदीपांपैकी तब्बल पाच हजार पथदीप बंद असल्याची स्थिती आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीतही अनेक रस्ते अंधारात राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, नवीन पथदीप बसविण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीचा प्रस्ताव महापालिकेच्या महासभेत मंजूर झाला असला, तरी संबंधित एजन्सीसोबतचा करार अद्याप झालेला नाही. त्यामुळे नवीन पथदीप बसविण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. शहरातील पथदीपांच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न गेल्या काही काळापासून कायम आहे. अनेक भागांतील दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात बाजारपेठा, मुख्य रस्ते आणि अंतर्गत भागांत नागरिकांची वर्दळ वाढते. अशा परिस्थितीत पथदीप बंद असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. दिवाळीपूर्वी पथदीप सुरू होतील, अशी अपेक्षा असताना अद्यापही मोठ्या संख्येने दिवे बंदच आहेत. करार अटींमध्ये बदल शहरात नवीन पथदीप बसविण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीच्या प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेने मंजुरी दिली आहे. मात्र, यापूर्वी ईएसएल या एजन्सीकडून अपेक्षित पद्धतीने काम झाले नसल्याचा अनुभव लक्षात घेऊन प्रशासनाने नव्या पथदीपांच्या कामासंदर्भातील दोन-तीन अटींमध्ये बदल केले आहेत. भविष्यात कामाच्या गुणवत्तेबाबत आणि अंमलबजावणीबाबत अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी हे बदल करण्यात आल्याचे समजते. चौकट एजन्सीचा प्रतिनिधीची प्रतीक्षा या बदलांची माहिती महापालिका प्रशासनाने संबंधित एजन्सीला कळविली आहे. आता एजन्सीच्या प्रतिनिधींसोबत लवकरच बैठक घेऊन अटींवर चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर कराराची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. कोट.. शहरातील पथदीप संबधित कामांचा संबंधित एजन्सींचा करारा तयार झालेला आहे. करारात काही बदल केला असून एजन्सीचा प्रतिनिधी येऊन ती प्रक्रिया पार पाडून लगेच काम सुरू करण्याबाबतचे नियोजन केले जाणार आहे. - आदित्य जिवने, आयुक्त. महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com