लक्ष्मीपूजनाच्या रात्री जळगावात आगीच्या १६ घटना

लक्ष्मीपूजनाच्या रात्री जळगावात आगीच्या १६ घटना
Published on: 
NSK26H34806 जळगाव : अग्निशमन विभागाचे कर्मचारी आग विझविताना. --- लक्ष्मीपूजनाच्या रात्री जळगावात १६ आगीच्या १६ घटना गवत, कचरा आणि पुठ्ठ्यांनी घेतला पेट; शिवाजीनगरमध्ये घराला किरकोळ आग सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या रात्री शहरात आगीच्या घटनांनी अग्निशमन दलाची चांगलीच धावपळ उडाली. रविवारी (ता. ८) सायंकाळी ६.२५ ते रात्री ११.३५ या सव्वापाच तासांच्या कालावधीत शहरातील तब्बल १६ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. बहुतांश ठिकाणी मोकळ्या जागेतील गवत आणि कचऱ्याने पेट घेतला. शिवाजीनगर परिसरात महापालिकेच्या दवाखान्याजवळ एका घराला किरकोळ आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत सर्व ठिकाणच्या आगींवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने कोणत्याही घटनेत जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी ६.२५ वाजता अजिंठा चौफुलीजवळील चारचाकी वाहनाच्या शोरूम परिसरात गवताला आग लागल्याची पहिली घटना घडली. त्यानंतर एमआयडीसीतील एचडी फायरजवळ कचरा, साईनगरमधील हनुमान मंदिरासमोर पुठ्ठे आणि वैकुंठधामसमोरील कचऱ्याने पेट घेतला. रात्री ८.०८ वाजता शिवाजीनगरमधील महापालिका दवाखान्याजवळ घराला आग लागल्याची घटना घडली. ही आग किरकोळ स्वरूपाची होती. या ठिकाणी लागल्या अपघात यानंतर डीएसपी चौक, शिरसोली रोडवरील हरिअंत सफारी अपार्टमेंटसमोरील परिसर, कानळदा रोडवरील सुरेश कलेक्शनसमोरील मोकळी जागा, रायसोनीनगर, गणपतीनगर-पिंप्राळा, शिव कॉलनीतील दत्त मंदिराजवळ, मानराज पार्क-पिंप्राळा, आरटीओ कार्यालयासमोरील परिसर, गुजराती गल्ली आणि समतानगर अशा विविध ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. यापैकी बहुतांश घटना गवत आणि कचऱ्याला आग लागल्याच्या होत्या. चौकट अग्निशमन दलाची सतर्कता एकाच रात्री १६ ठिकाणी आगीच्या घटना घडल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना सातत्याने धावपळ करावी लागली. प्रत्येक ठिकाणी तत्काळ पोहोचून जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. दिवाळीच्या उत्सवात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाने दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.