टुडे २ साठी, मेन फिचर
-------
(पिकांच्या नुकनानीचा संग्रहित फोटो वापरावा)
---
जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टर खरीप पिकांचे नुकसान
दुष्काळाचा फटका; सव्वासात लाख शेतकऱ्यांसाठी ९२७ कोटी अनुदानाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.३१ : जिल्ह्यात ‘एलगनिनो’मुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. बागायती तसेच जिरायत खरीप शेतपिकांचे नुकसान झाले आहे. शासनस्तरावरून दुष्काळ सदृश परिस्थितीनुरूप नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून ३३ पेक्षा अधिक तसेच निम्मेपेक्षा अधिक वर्गवारीनुसार साडेसहा लाख हेक्टर शेतपिक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. सव्वासात लाख शेतकऱ्यांसाठी ९२५ कोटी ५१ लाख रूपये अनुदान मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे.
जिल्ह्यात मॉन्सूनदरम्यान यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी जेमतेम ६० टक्केपेक्षा कमी पाऊस झाला. (दुष्काळ सदृश परिस्थिती) जिल्ह्यात केळी, बागायती, जिरायत कपाशी, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद, मूग, तीळ, कांदा, भूईमूग आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात शासननिर्देशानुसार ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसानग्रस्त वर्गवारीनुसार बाधित शेतीक्षेत्राचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्यानुसार जिल्हा महसूल प्रशासन, कृषी विभागासह जिल्हा परिषद ग्रामपंचायत प्रशासन यांच्या संयुक्त पथकाकडून दुष्काळ सदृश परिस्थितीचे पंचनामे करण्यात आले. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात सुमारे सहा लाख ४५ हजार ५२ हेक्टर ४० आर क्षेत्रावरील तब्बल ७ लाख २० हजार ४५२ शेतकऱ्यांचे नुकसानीची नोंद झाली आहे.
पिकांचे पंचनामे
यात मका १०६९९०.२५, ज्वारी ७०१५, बाजरी ७२९.३२, मूग ३८७८.२२, उडीद ५६४०.२३, सोयाबीन ४४९३८.०९, तिळ १५१.०३, जिरायत कपाशी ५५४९७.३४, तूर २४१४६.०५, भूईमूग ७६५.७८, अन्य २५०३.०६ तसेच बागायत कपाशी २९३०४८.२५, मका २२०५.२०, तूर ५१३९.५४, कांदा १३९९.०९, हळद, उस, भाजीपाला, केळी ६५६७५.६६, पपई, आंबा, आदी नुकसानग्रस्त शेतपिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत.
‘जिरायत’ला फटका
दुष्काळामुळे २ लाख ५२ हजार २५४.३७ हेक्टर जिरायत क्षेत्रावरील २ लाख ७४ हजार ७५६ शेतकरी बाधित झाले आहेत. तसेच ३ लाख १० हजार ३६२.२३ हेक्टर बागायत क्षेत्रावरील ३ लाख ४७ हजार ३०६ शेतकरी बाधित असून ८२ हजार ४३५.८५ हेक्टर क्षेत्रावरील ९८ हजार ३९० फळपिक बागायत शेतकरी असे एकूण ६ लाख ४५ हजार ५२ हेक्टर ४० आर क्षेत्रावरील ७ लाख २० हजार ४५२ शेतकऱ्यांच्या खरीप बागायत व जिरायत शेतपिकांचे नुकसान पंचनामे नोंद करण्यात आली आहे.
-----------------
कोट
कमी पर्जन्यमान दुष्काळी परिस्थितीमुळे जळगाव जिल्ह्यातील ३३ टक्क्यांच्यावर ६ लाख ४५ हजार ५२ हेक्टर ४० आर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ९२७ कोटी ५१ लाख २५ हजार ५५५ रुपयांच्या अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. शासन निर्देशानुसार मंजूर अनुदान निधी प्राप्त झाल्यानंतर तालुकानिहाय बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी वा त्यादरम्यान अनुदान वितरित करण्यात येईल.
- रोहन घुगे, जिल्हाधिकारी
----------