तक्रारी करूनही शहरात कचऱ्याचे ढीग कायम

तक्रारी करूनही शहरात कचऱ्याचे ढीग कायम
Published on: 
टुडे पान २ : मेन फिचर NSK26H33570 जळगाव : शाहू नगरातील ट्रॅफिक गार्डन येथील साचलेल्या कचऱ्याला लावलेली आग. ........ NSK26H33571 विठ्ठलपेठ - जुने जळगाव रस्त्यावर २२ दिवसांपासून साचलेला कचऱ्याचा ढीग. ........... तक्रारीनंतरही शहरात कचऱ्याचे ढीग कायम श्रीकृष्णनगरात २२ दिवसांपासून कचरा पडून; शाहूनगरातील नागरिक कचरा जाळल्याने हैराण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २६ : शहरातील कचरा संकलन आणि स्वच्छतेची समस्या अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. याचे पडसाद काही दिवसांपूर्वी झालेल्या महासभेत तसेच स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी स्वच्छतेच्या मक्ता घेतलेल्या बीव्हीजी कंपनीच्या कामावर नाराजी व संताप व्यक्त करून केली होती. बीव्हीजी कंपनीकडून अनेक रस्त्यावरचे कचर्याचे ढीग उचलत असले तरी कचऱ्याचे ढीग कायम असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे शहरात नियमित कचरा संकलनासाठी महापालिकेच्या आरोग्य विभाग व सफाई मक्तेदार यांची व्यवस्थेबाबत चिन्ह निर्माण होत आहे. शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी महापौर स्वच्छता संकल्प अभियान अंतर्गत शहरातील सर्व प्रभागांमध्ये महापौर दीपमाला काळे यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नियमित कचरा संकलन, तक्रारींचे त्वरित निराकरण आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट यावर भर देण्याची गरज असल्याची नागरिकांकडून बोलले जात आहे. श्रीकृष्णनगर रस्त्यावर ढीग प्रभाग क्रमांक १६ मधील विठ्ठल पेठ, जुने जळगाव परिसरातील श्रीकृष्णनगर येथे मुख्य रस्त्यालगत नाल्याच्या बाजूला गेल्या २२ दिवसांपासून कचऱ्याचा मोठा ढीग पडून आहे. कचरा उचलण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक, मुकादम तसेच लोकप्रतिनिधींना फोनवरून वारंवार तक्रारी केल्या. मात्र, अद्याप कचरा उचलण्यात आलेला नसल्याने परिसरातील नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. श्रीकृष्णनगरातील मुख्य रस्त्यालगतच कचरा पडून असल्याने परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग आणि कचरा संकलनाचा मक्ता असलेल्या बीव्हीजी कंपनीच्या यंत्रणेने अशा ठिकाणांवरील कचरा नियमित उचलण्याची गरज आहे. चौकट जाळलेल्या कचऱ्यातून धुराचे लोट दरम्यान, महापौर स्वच्छता अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक ६ मधील शाहूनगर येथील ट्रॅफिक गार्डन परिसरातील स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता करून जमा केलेला कचरा हा सफाई कर्मचाऱ्यांनी नंतर जाळला. कचऱ्याचे प्रमाण मोठे असल्याने हा कचरा तब्बल तीन दिवस जळत होता. तसेच जळणाऱ्या कचऱ्यातून परिसरात धुराचे लोट पसरत असल्याने नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com