NSK26H35051
जळगाव : शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी करताना वैद्यकीय पथक. यावेळी उपस्थित आमदार सुरेश भोळे आदी.
------------
शिबिरात २८७ रुग्णांची आरोग्य तपासणी
----
लहुजी वस्ताद-बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विविध संघटनांतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे व भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त धर्म जागरण संस्था व निरामय सेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हरीविठ्ठल नगरातील हनुमान मंदिर परिसरात रविवारी (ता.१५) आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात २८७ रुग्णांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.
समाजातील सर्वसामान्य नागरिकांत आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, आजारांचे वेळीच निदान होऊन उपचार घेणे शक्य व्हावे, या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरास आमदार सुरेश भोळे, अजित राणे, डॉ. स्वप्निल सोनवणे, डॉ. अंजली पाटील, डॉ. नेहा चौधरी, डॉ. लतीफ कोल्हे, तुषार पाटील, मनोज जंजाळ, पिंटू बारी, यशवंत कपडे, चंद्रकांत तायडे व बेबा सूर्यवंशी उपस्थित होते. या शिबिराला जळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहकार्य लाभले. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनीही उपक्रमासाठी सहकार्य केले.