NSK26H31487
जळगाव : राज्य कबड्डी स्पर्धेसाठी रवाना झालेल्या कुमार-कुमारी संघातील खेळाडूंसमवेत मोहन भावसार, श्याम कोगटा, गिरीश नाईक, महेश बुटी आदी.
–––
राज्य कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघ रवाना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : पालघर आयोजित करण्यात आलेल्या ५३ व्या कुमार व कुमारी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा कुमार व कुमारी संघ रवाना झाला. या स्पर्धा ८ ते ११ ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत.
ॲड. एस. ए. बाहेती महाविद्यालय येथे कुमार व कुमारी खेळाडूंचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे निवड समिती सदस्य प्रा. हरीश शेळके, कमलेश पाटील व प्रशांत कोल्हे यांनी अंतिम १४ कुमार व १४ कुमारी खेळाडूंची निवड केली. प्रशिक्षक आनंद महांगडे व हितेश सोनी यांनी दोन्ही संघांकडून कसून सराव करून घेतला. संघ रवाना होण्यापूर्वी जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आजीवन अध्यक्ष मोहन भावसार, अध्यक्ष श्याम कोगटा, नगरसेवक अरविंद देशमुख, कार्याध्यक्ष गिरीश नाईक यांनी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश बुटी, संजय संसारे, सचिव नितीन बरडे, सहसचिव सुनील राणे, खजिनदार प्रा. हरीश शेळके, सदस्य ॲड. रोहन बाहेती आदी उपस्थित होते.
चौकट
कुमार संघ
हर्षल बागुले (कर्णधार), शुभम परदेशी, यश रायसिंग, तेजेंद्र सपकाळे, शिवम सोनवणे, जुनेद खाटीक, हर्षल विसपुते, रोहित बारी, साहिल पिंजारी, करण अभांगे, निखिल वांद्रे, रोहित महाजन, रुद्रेश लखारी, करण सपकाळे, प्रशिक्षक : हितेश सोनी, व्यवस्थापक : सचिन पाटील.
मुलीचा संघ
हर्षदा माळी (कर्णधार), चैताली पाटील, वैष्णवी पाटील, गायत्री माळी, उर्मिला तायडे, हर्षदा पाटील, माहिया मंडल, निशा पाटील, साक्षी मराठे, प्रज्ञा जगताप, श्रावणी चोरमुले, हर्षाली वाणी, नयना माशाने, संजना महाजन, प्रशिक्षक : आनंद महांगडे, व्यवस्थापक : रुणाल वाणी.