सेकंडमेन
NSK26H34771
जळगाव : शहरालगतच्या कोल्हहिल्स परिसरातील न्यू लक्ष्मीनगराजवळील वनविभागाच्या डोंगरातील जंगलाला रविवारी दुपारी लागलेली आग.
------------
NSK26H34772
आग विझविताना अग्निशमन दलाचे कर्मचारी.
-----------
NSK26H34774
जंगलातील जळालेले गवत.
---------
कोल्हे हिल्स परिसरात वणव्याने डोंगर पेटला
----------
काेरड्या गवताने पेट घेतल्याने पसरली आग
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.८ : शहरालगतच्या कोल्हे हिल्स परिसरातील पठाण बाबा दर्ग्यामागील वनविभागाच्या डोंगराला रविवारी (ता.८) दुपारी अचानक आग लागली. या अगीत भला मोठा परिसर आगीच्या कवेत सापडल्याने एकच गोंधळ उडाला. महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने धाव घेत दोन तासांच्या परिश्रमाअंती आगीवर नियंत्रण मिळविले.
जळगाव शहरालगतच्या कोल्हेनगर परिसरात वनविभागाच्या अख्त्यारीतील ओसाड डोंगराळ परिसरात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास अचानक आग लागली. डोंगराळ परिसरात संपूर्ण कोरडे झालेल्या गवताळ भागाने काही मिनिटांतच संपूर्ण परिसर आगीने आपल्या कवेत घेण्यास सुरवात केली. आगीची माहिती परिसरातील तरुणांनी अग्निशामक दलास दिल्यावर महाननगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे दोन बंब काही वेळातच घटनास्थळी दाखल झालेत. दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून आगीवर पाण्याचा मारा करण्यात आल्यावर आग नियंत्रणात आली.
दर वर्षीच लागते आग...
कोल्हेहिल्स् परिसरातील डोंगराळ परिसर हा वनविभागाच्या अख्यातरीतील आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सरपटणारे प्राणी, पक्षी व बिळात राहणाऱ्या जिवांचा आधिवास असून, आगीच्या घटनेत या जैवविविधतेचे नुकसान झाले आहे. काही प्राण्यांचा मृत्यू झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.