जळगावचे किमान तापमान राज्‍यात निच्चांकी

जळगावचे किमान तापमान राज्‍यात निच्चांकी
Published on: 
जळगावचे किमान तापमान राज्‍यात नीचांकी --- १२.७ अंशांची नोंद, नाशिकच्‍या पाऱ्यात दीड अंशाची वाढ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : राज्‍यभर थंडीची लाट आली असताना, सोमवारी (ता. १६) नाशिकच्‍या पाऱ्यात दीड अंशाची वाढ नोंदविली आहे. जळगावचे किमान तापमान १२.७ अंश नोंदविले गेले असून, हे राज्‍यातील नीचांकी किमान तापमान राहिले. वातावरणात गारठा टिकून असल्‍याने नागरिकांकडून आता स्‍वेटर, जॅकेटसह उबदार कपड्यांचा वापर सुरू झाला आहे. रविवारी (ता. १५) नाशिकचे किमान तापमान १२.६ अंश, तर निफाडचे किमान तापमान ११ अंश सेल्‍सियस नोंदविले गेले होते. यात साधारणतः दीड अंशाची वाढ होऊन सोमवारी नाशिकचे किमान तापमान १४ अंश सेल्सियस नोंदविले गेले आहे; तर निफाडच्‍या किमान तापमानात किरकोळ वाढ होऊन ११.१ अंश सेल्सियस इतक्‍या किमान तापमानाची नोंद घेण्यात आली. राज्‍यात थंडीची लाट पडली असताना, उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा जोर कायम आहे. यंदाच्‍या हंगामात प्रथमच राज्‍यात उत्तर महाराष्ट्राचे किमान तापमान नीचांकी स्‍तरावर नोंदविले गेले. सोमवारी जळगावचे किमान तापमान १२.७ अंश सेल्‍सियस होते. हे राज्‍यातील नीचांकी किमान तापमान राहिले. एकंदरीत गारठा वाढल्‍याने शहरी व ग्रामीण जनजीवनावर परिणाम जाणवतो आहे. रात्री लवकरच रस्‍ते ओस पडू लागले असून, बाजारपेठांमधील वर्दळ सायंकाळनंतर कमी होत आहे. यंदा कडाक्‍याची थंडी पडण्याचा अंदाज असल्‍याने उबदार कपड्यांच्‍या खरेदीची लगबग सध्या पाहायला मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.