मनपा कर्मचार्यांच्या काळ्या फिती लावून आंदोलन

मनपा कर्मचार्यांच्या काळ्या फिती लावून आंदोलन
Published on: 
NSK26H34346 जळगाव : शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी जमलेले महापालिकेचे कर्मचारी. -------- मनपा कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन ----- पोलिस ठाण्यावर मोर्चा; आरोग्य निरीक्षकाला शिवीगाळ केल्याचा निषेध सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २ : महापालिकेचे आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक रुपेश भालेराव हे कर्तव्य बजावताना शिवीगाळ करून मारहाणीचा प्रयत्न झाल्याच्या निषेधार्थ भारतीय मजदूर संघाच्या महापालिका शाखेतर्फे सोमवारी (ता.२) सकाळी दहाला महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. दरम्यान, महापालिकेपासून शहर पोलिस ठाण्यापर्यंत पायी मोर्चा काढून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेतील स्वच्छता निरीक्षक (एसआय) रुपेश भालेराव हे कर्तव्य बजावत असताना एका नगरसेविकेच्या नातेवाइकांकडून त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली व मारहाणीचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या घटनेच्या निषेधार्थ संघटनेने कर्मचारी एकजुटीचे आवाहन केले होते. त्यानुसार सोमवारी सकाळी महापालिका प्रांगणात अधिकारी, कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी काळ्या फिती लावून एकत्र आले. यानंतर अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर व उपायुक्त निर्मला गायकवाड यांना निवेदन देऊन कर्मचाऱ्यांवरील हल्ले, धमक्या व शिवीगाळ रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, कर्मचाऱ्यांना प्रशासकीय व कायदेशीर संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर सुमारे २०० महापालिका कर्मचार्यांचा मोर्चा शहर पोलिस ठाण्यावर धडकला. पोलिसांकडे तक्रार देत कारवाईची मागणी करण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या आंदोलनात सचिव गौरव पुराणिक, कार्याध्यक्ष समीर बोरोले यांच्यासह पदाधिकारी व मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले. कर्मचारी वैयक्तिक नोकर नाहीत महापालिका कर्मचारी कोणाचेही वैयक्तिक नोकर नसून, कायद्याच्या चौकटीत काम करणारे जनतेचे सेवक आहेत. त्यांच्या सन्मानाशी व सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका संघटनेचे अध्यक्ष गौरव सपकाळे यांनी मांडली. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र धोरण व कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्याची मागणीही करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.