NSK26H34610
जळगाव : वृत्तपत्र विक्रेता बांधवांना मिठाईवाटप कार्यक्रमांत उपस्थित मान्यवर.
वृत्तपत्र विक्रेता बांधवांना मिठाईवाटप
वृत्तपत्र विक्रेता विकास फाउंडेशनतर्फे ‘स्नेहमिलन’ उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : दरवर्षाप्रमाणे जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे गुरुवारी (ता. ५) वृत्तपत्र वाटप करणारे व वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांसाठी दिवाळीनिमित्त स्नेहमिलन व मिठाईवाटप कार्यक्रम सायंकाळी केमिस्ट भवन येथे झाला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक विशाल भोळे, महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन उपाध्यक्ष सुनील भंगाळे, जैन उद्योग समूहाचे मीडियाप्रमुख अनिल जोशी, शिवसेना जळगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख श्याम कोगटा हे उपस्थित होते.
यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. श्री. जोशी यांनी मार्गदर्शन केले व मंडळास योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी गोपाळ चौधरी यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या कार्याची माहिती दिली. तसेच या कार्यास अनेक वर्षांपासून उपस्थित मान्यवरांसह ‘गुजरात स्वीट’चे संचालक नीलेश मदानी योग्य ती मदत करीत असल्याने त्यांचे आभार मानले. यावेळी सुनील भंगाळे यांची महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल फाउंडेशनतर्फे अध्यक्ष प्रा. नितीन चौधरी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी विचारांची देवाणघेवाण केली.
यावेळी प्रा. नितीन चौधरी, रवींद्र जोशी, विलास वाणी, भालचंद्र वाणी, अनिल पाटील, वसंत गायकवाड, उपाध्यक्ष विशाल वाणी, संजय चौधरी सचिव विजय कोतकर, अर्जुन पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमास सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना मिठाई व फरसाण वाटप करण्यात आले. यशस्वितेसाठी मंडळाचे तुषार चौधरी, महेश सोनार, हरीश चौधरी, दिनेश वाणी, हिरालाल टेकावडे, किशोर साळुंखे, राकेश सोनार यांनी परिश्रम घेतले.