टुडे १, मेन (फोटोफीचरमध्ये एक फोटो मोठा वापरावा)
-----
NSK26H33192 (हा फोटो मोठा वापरावा)
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर बांभोरीजवळील जुन्या पुलाच्या बाजूला समांतर पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.
------------
NSK26H33194
मशिनद्वारे खड्डा करताना.
------------
NSK26H33195
पिलर उभारणीसाठी तयार केलेला लोखंडी पिंजरा.
-----------
NSK26H33198
जेसीबीने मशिनचे पार्ट घेऊन जाताना.
-----------
NSK26H33199
तुटलेल्या पार्टला वेल्डिंग करताना कामगार.
------
गिरणा नदीवर वर्षभरात उभारणार समांतर पूल
उपशीर्षक
बांभोरीजवळ वाहतूक कोंडीवर उपाय; महामार्ग नूतनीकरणात समावेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर बांभोरीजवळ गिरणा नदीपात्रात सध्या जुना पूल आहे. या पुलाची दुरवस्था झाली असून तो धोकादायक बनला आहे. शहरातील महामार्गाच्या नूतनीकरण व मजबुतीकरणाच्या कामात या पुलालगत समांतर पुलाच्या कामाचा समावेश करण्यात आला असून त्याच्या कामाला नुकतीच सुरवात झाली आहे. वर्षभरात पुलाचे काम पूर्ण होईल, असा दावा केला जात आहे.
धुळे- जळगावदरम्यान चौपदरी महामार्ग होताना जळगाव शहराला वळसा घालून पाळधी- तरसोददरम्यान वळण रस्ता (बायपास) करण्यात आला. नंतरच्या टप्प्यात शहरातील महामार्गावर खोटेनगर ते कालिकामाता मंदिरापर्यंत चौपदरीकरण करण्यात आले. २०२२ मध्ये साधारणत: ७ किलोमीटर टप्प्याचे चौपदरीकरण पूर्ण झाले. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांत या रस्त्याच्या कामाची वाट लागली. त्यामुळे एकूणच या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
पाळधी-जळगाव अन्
जळगाव- तरसोदचे काम
शहरातील ७ किलोमीटर टप्प्याचे चौपदरीकरण झाले, मात्र पाळधी ते खोटेनगर व कालिकामाता मंदिर ते तरसोद फाट्यापर्यंतच्या रस्त्याचा त्यात समावेश नव्हता. त्यामुळे हे दोन्ही टप्पे एकेरी मार्गाचेच राहिले. आता या दोन्ही टप्प्यातील एकेरी मार्गांचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर शहरातून गेलेल्या चौपदरी महामार्गासह त्याला लागून असलेल्या सेवारस्त्यांचे नूतनीकरण व मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
बांभोरीजवळ समांतर पूल
या कामातच बांभोरीजवळ सध्याच्या जुन्या पुलाजवळ समांतर पुलाच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे. मुळात सध्याचा जुना पूल कालबाह्य होण्याच्या मार्गावर अून तो धोकेदायक बनला आहे. शिवाय, हा रस्ताच एकेरी असल्याने अनेकदा पुलावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. सध्या वळणरस्ता (बायपास) बंद असल्याने अवजड वाहतूक शहरातून वळविण्यात आली आहे. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अपघात वाढले असून अडीच महिन्यांत ९ जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे शहरातील महामार्ग वाहतुकीसाठी सुलभ होण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वाची आहेत.
चौकट
वर्षभराची मुदत, कामाला गती
एकीकडे जुन्या महामार्गावर, म्हणजेच निमखेडी- बांभोरीदरम्यानच्या मार्गावर एका लहान पुलाचे काम आधीपासूनच सुरू असले तरी ते पूर्ण झालेले नाही. आणि आता सध्याच्या बांभोरीजवळील पुलाला समांतर पूल उभा राहणार असल्याने विशेषत: जळगाव शहरातील वाहनधारकांची मोठी सोय होणार आहे. नंदुरबारच्या ड्रीम कन्स्ट्रक्शनने हे काम घेतले असून कामाची मुदत एका वर्षाची आहे. सध्या या पुलाच्या कामासाठी लागणारी मोठी यंत्रसामग्री कामाच्या ठिकाणी आणण्यात आली आहे.
-----------