जिल्‍ह्‍यात एकाच रात्री सर्व पोलिस उतरले रस्त्यावर

जिल्‍ह्‍यात एकाच रात्री सर्व पोलिस उतरले रस्त्यावर
Published on: 
NSK26H35065 व NSK26H35064 जळगाव : मद्यपी व नियम मोडणाऱ्या वाहनधारकांची तपासणी करताना पोलिस. दुसऱ्या छायाचित्रात पोलिस ठाण्यात ताब्यात घेतलेले वाहनचालक. ---------------- जिल्ह्यात एकाच रात्री सर्व पोलिस उतरले रस्त्यावर ------- मद्यपी वाहनचालकांसह नियम मोडणाऱ्या ५२६ जणांवर गुन्हे; दोन लाखांचा दंड वसूल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१५ : मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ४९ वाहनचालकांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५२६ चालकांवर पोलिसांनी कारवाई करीत दोन लाख १३ हजार ८५० रुपयांचा दंड आकारला. पोलिसांनी ही कारवाई शनिवारी(ता.१४) एकाच रात्रीतून जिल्हाभरात केली. जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या सुचनेवरून संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी (ता.१४)रात्री एकाचवेळी विशेष मोहीम राबविण्यात आली. यात सर्व उपविभागीय अधिकारी, पोलिस ठाण्याचे प्रभारी, कर्मचारी, वाहतूक शाखेचे प्रभारी व कर्मचारी सहभागी होते. या मोहिमेंतर्गत जिल्हाभरात विविध ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५२६ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांना दोन लाख १३ हजार ८५० रुपये दंड करण्यात आला. या मोहिमेत ३० जण उघड्यावर मद्यपान करताना आढळले. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. चौकट कारवाईचा प्रकार व संख्या ड्रंक अँड ड्राईव्ह - ४९ फॅन्सी नंबर प्लेट - १५ तीन सीट प्रवास - ४ विना वाहन परवाना - १ विना हेल्मेट - ६२ कलम ६६/१९२ (विनापरमिट) - ८ मोटार वाहन कायदा - ३५६ इतर - ३१ --------पूर्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.