सेकंड मेन
NSK26H31331
जळगाव : दारु भट्ट्या उद्ध्वस्त करताना पोलिस पथके.
अवैध दारुविरोधात पोलिसांची धडक मोहीम
जिल्ह्यात एकाच वेळी ठिकठिकाणी छापे; ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी जळगाव पोलिस दलाकडून संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धडक कारवाईत ३१ लाख ९५ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १३७ संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव), सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी जिल्ह्यात विवीध तालूक्यांमध्ये हातभट्ट्या उद्ध्वस्त, मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अमंलदार आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सक्रिय सहभाग घेतला. गोपनीय माहितीच्या आधारे अवैध हातभट्टी दारू निर्मितीचे अड्डे, दारू विक्रीची ठिकाणे, साठवणूक केंद्रे आणि अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अचानक छापे टाकण्यात आले. कारवाईदरम्यान अवैध दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन, कच्चे साहित्य, तयार दारू व वाहने जप्त करून हातभट्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्या.
ग्राफ
. दृष्टिक्षेपात कारवाई.
- एकूण दाखल गुन्हे : १३७
- एकूण संशयित : १३७
- जप्त गावठी दारू : ४०६९ लिटर
- नष्ट रसायन : ४७ हजार ८१६ लिटर
- विदेशी/देशी दारू : २३७ नग देशी दारू बाटल्या
- एकूण जप्त मुद्देमाल : ३१ लाख ९५ हजार ३६०
नऊ महिन्यातील कारवाई
- २ हजार ५२२ संशयितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत
- एकूण २५०६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
माहिती देण्याचे आवाहन
माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतूक करणाऱ्यांची माहिती असल्यास नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलिसांना कळवावे, माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.