जळगाव रेल्वे स्थानकाला १६४ वर्षांचा ऐतिहासिक प्रवास

जळगाव रेल्वे स्थानकाला १६४ वर्षांचा ऐतिहासिक प्रवास
Published on: 
टुडे ४ ॲंकर NSK26H32267 जळगाव : रेल्वे स्थानकात झालेल्या स्थानक महोत्सवात सहभागी शाळेला सन्मानित करताना स्थानक अधीक्षक कौस्तुभ चौधरी. सोबत रेल्वेचे अधिकारी. ......... जळगाव रेल्वे स्थानकाचा १६४ वर्षांचा ऐतिहासिक प्रवास स्थानक महोत्सवात १५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; रेल्वेच्या वारशाचे प्रदर्शन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव रेल्वेस्थानकाने सेवेची १६४ वर्षे पूर्ण केली. या ऐतिहासिक टप्प्यानिमित्त मंगळवारी (ता. १३) स्थानकावर स्थानक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. तिरंगी रोषणाईने सजविलेल्या स्थानकात विद्यार्थ्यांसह रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. जळगाव रेल्वे स्थानकाची स्थापना ६ ऑक्टोबर १८६२ रोजी झाली. वर्धापनदिनानिमित्त आयोजित महोत्सवाची सुरुवात स्थानकाच्या छायाचित्राने सजविलेला विशेष केक कापून करण्यात आली. मंडळ यांत्रिक अभियंता (ओ अँड सी) युनुस अन्सार मकाणू यांनी खुबचंद सागरमल विद्यालयातील विद्यार्थ्यांसमवेत आनंद साजरा केला. या वेळी १५० हून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. भारतीय रेल्वेच्या गौरवशाली वारशाची ओळख नव्या पिढीला या ऐतिहासिक जळगाव रेल्वे स्थानकात उपक्रमाच्या माध्यमातून रेल्वे प्रशासाने माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्थानक अधीक्षक कौस्तुभ चौधरी यांच्यासह मुख्य आरोग्य निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल तसेच विद्युत आणि वाणिज्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. चौकट रेल्वेच्या इतिहासाचे प्रदर्शन महोत्सवाचे प्रमुख आकर्षण रेल्वे वारशावरील प्रदर्शन ठरले. यात रेल्वे इंजिने, डबे आणि मालवाहू वॅगन यांच्या प्रतिकृतींसह भारतीय रेल्वेच्या ऐतिहासिक प्रवासाशी संबंधित विविध वस्तू मांडण्यात आल्या. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना रेल्वेचा इतिहास, तांत्रिक प्रगती आणि कार्यपद्धती जाणून घेण्याची संधी मिळाली. या निमित्ताने विद्यालयात आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com