भारत विकास परिषदेतर्फे

भारत विकास परिषदेतर्फे
Published on: 
NSK26H32053 जळगाव : भारत विकास परिषदेतर्फे आयोजित प्रश्नमंजूषा व समूहगान स्पर्धेत विजेत्या संघासमवेत उपस्थित मान्‍यवर. ––– क्षेत्रीय प्रश्नमंजूषा, समूहगान स्पर्धेसाठी ओरियन’ संघ पात्र छत्रपती संभाजीनगरही ठरले विजेते सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : भारत विकास परिषदेतर्फे आयोजित प्रश्नमंजूषा व समूहगान स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील पी.यू. जैन प्राथमिक स्कूल आणि जळगावच्या ओरियन सीबीएसई हे संघ क्षेत्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. भारत विकास परिषदेच्या या प्रांतस्तरीय स्पर्धांचे सुदर्शन पॅलेस येथे आयोजन करण्यात आले होते. जळगाव शाखेला स्पर्धेच्या यजमानपदाचा सन्मान प्राप्त झाला होता. या स्पर्धेत जिल्हास्तरीय स्पर्धेतील छत्रपती संभाजीनगर, धुळे, शिरपूर, जळगाव येथील प्रथम क्रमांकाच्या पाच संघांनी सहभाग घेतला. संस्कार भारतीचे महानगर अध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष महाले यांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवाती झाली तर पारितोषिक वितरण उद्योजक राम सहाय शर्मा व प्रा. भगतसिंह निकम यांच्या हस्ते करण्यात आले. चेतना के स्वर या राष्ट्रीय समूहगान स्पर्धेचे परीक्षण संगीत अलंकार, मोहिनी खाडीलकर व संगीत विशारद स्वाती बोरकर यांनी केले. हिंदी, संस्कृत व लोकगीत या तीनही प्रकारात ओरियन सीबीएसई स्कूल जळगाव संघाने प्रथम तर कमलाबाई कन्या हायस्कूल धुळे संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तृतीय पारितोषिक पी. यू. जैन प्राथमिक स्कूल छत्रपती संभाजीनगर यांनी मिळविले. चौकटत्र तीन संघांना सांघिक विजेतेपद सांघिक विजेतेपद देखील याच तीन संघांनी प्राप्त केली. स्पर्धेस भारत विकास परिषदेचे महाराष्ट्र उत्तर प्रांत अध्यक्ष विशाल चोरडिया, क्षेत्रीय सेवा गतिविधी संयोजक तुषार तोतला, अरुण जोशी, प्रांत उपाध्यक्ष योगेश मांडे, प्रांत सचिव राजेंद्र जाखडी, छत्रपती संभाजीनगर शाखा अध्यक्ष मोहिनी कुबेरकर, नवचेतना जळगाव शाखा अध्यक्ष शुभम बंब आणि दुष्यंत जोशी, शरद पांडे, श्रीहर्ष खाडीलकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. संस्कार गतिविधी प्रमुख जान्हवी खाडिलकर, जळगाव शाखा अध्यक्ष अनिरुद्ध कोटस्थाने, सचिव भूषण गुरव यांच्या मार्गदर्शनात स्पर्धेचे नियोजन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com