महापौरांच्या नाराजीनंतर अतिक्रमण विभागाची धडक मोहीम

महापौरांच्या नाराजीनंतर अतिक्रमण विभागाची धडक मोहीम
Published on: 
NSK26H32131 जळगाव : बेंडाळे महिला महाविद्यालयाजवळील मुख्य रस्त्यावर अतिक्रमित हॉकर्सची गाडी जप्त करताना पथकाचे कर्मचारी. ........ महापौरांच्या नाराजीनंतर अतिक्रमण विभागाची धडक मोहीम पाच ठिकाणी कारवाई; १५ हातगाड्या, टेबल-खुर्च्यांसह चार ट्रॅक्टर साहित्य जप्त सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : शहरातील अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई होत नसल्याबद्दल महापौर दीपमाला काळे यांनी महासभेत प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाईचा वेग वाढविला आहे. सोमवारी शहरातील पाच प्रमुख ठिकाणी राबविलेल्या मोहिमेत रस्त्यांवर अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांच्या १५ हातगाड्या, टेबल-खुर्च्या आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण चार ट्रॅक्टर साहित्य ताब्यात घेण्यात आल्याची माहिती विभागाने दिली. महापालिकेच्या महासभेत शहरातील वाढत्या अतिक्रमणांचा मुद्दा उपस्थित झाला होता. अतिक्रमण हटविल्यानंतर त्याच जागांवर पुन्हा दुकाने आणि हातगाड्या कशा लागतात, असा सवाल महापौर काळे यांनी केला होता. वारंवार अतिक्रमण होण्यामागील कारणांचा शोध घेण्यासह अतिक्रमण विभागातील कर्मचारी बदलण्याचे निर्देशही त्यांनी आयुक्तांना दिले होते. त्यानंतर प्रशासनाने कारवाईसाठी पथक सक्रिय केले. अतिक्रमण निर्मूलन विभागाने स्टेडियम चौक, स्वातंत्र्य चौक, डॉ. किनगे हॉस्पिटल परिसर, महात्मा गांधी उद्यान आणि बहिणाबाई चौधरी उद्यान परिसरात मोहीम राबविली. रस्ते आणि सार्वजनिक जागांवर अडथळा ठरणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करत साहित्य जप्त करण्यात आले. पथक पोहोचताच काही विक्रेत्यांनी हातगाड्या हटविल्या, तर काही ठिकाणी साहित्य जप्त करण्यावरून कर्मचाऱ्यांशी किरकोळ वाद झाले. महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांच्या आदेशाने, उपायुक्त पंकज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक संजय ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली. चौकट जप्त साहित्य सोडण्याचा निर्णय नाही कारवाईत जप्त केलेल्या हातगाड्या दंड आकारूनही तातडीने परत न देण्याची भूमिका विभागाने घेतली आहे. यासंदर्भात काही विक्रेत्यांनी महापौरांची भेट घेतली; मात्र त्यावर कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com