जिल्हा परिषद जळगाव येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया

जिल्हा परिषद जळगाव येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया
Published on: 
मनपातील २६ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन (उपशीर्षक) जि. प. शाळेत नियुक्ती; पवित्र पोर्टलमधील ७२ शिक्षकांनाही पदस्‍थापना सकाळ वृत्‍तसेवा जळगाव, ता. ७ : गतवर्षीच्‍या २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार जिल्‍ह्यातील नगरपालिका व महापालिका शाळांमध्‍ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया समुपदेशनाद्वारे आज (ता.७) पार पडली. यात अतिरिक्‍त ठरलेल्‍या २६ शिक्षकांचे समुपदेशनाद्वारे जिल्‍हा परिषद शाळांमधील रिक्‍त जागांवर पदस्‍थापना देण्यात आली. याशिवाय पवित्र पोर्टल टप्‍पा १ मधील ७२ शिक्षकांना देखील पदस्‍थापना देण्यात आली आहे. जिल्हा परिषद जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार ही प्रक्रिया आज (ता.७) जिल्‍हा परिषदेच्‍या छत्रपती शाहू महाराज सभागृहात पार पडली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी नीलेश पाटील उपस्थित होते. ही संपूर्ण प्रक्रिया शासनाच्या मार्गदर्शक सूचना व नियमांनुसार पारदर्शक आणि समुपदेशनाच्या माध्यमातून राबविण्यात आली. प्रक्रियेदरम्यान शिक्षकांना उपलब्ध रिक्त पदांची माहिती देऊन त्यांच्या पसंतीनुसार व नियमानुसार पदस्थापना व समायोजनाची कार्यवाही करण्यात आली. चौकट जिल्हा परिषदेच्या शाळेत पदस्‍थापना प्रथम महापालिका व नगरपालिका शाळांमध्‍ये अतिरिक्‍त ठरलेल्‍या २६ शिक्षकांना जिल्‍हा परिषद शाळांमध्‍ये पदस्‍थापना देण्यात आली. या प्रक्रियेत मराठी माध्यमाचे १४ व उर्दू माध्यमाचे १२ अशा एकूण २६ अतिरिक्त शिक्षकांचे समुपदेशनाद्वारे समायोजन करण्यात आले. तसेच पवित्र पोर्टल टप्पा-१ मधील कन्फर्मेशन राऊंडमध्ये प्राप्त झालेल्या यादीनुसार मराठी माध्यमाचे ५२ व उर्दू माध्यमाचे २० अशा एकूण ७२ शिक्षकांना जिल्हा परिषद शाळांमध्ये समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com