कचरा डेपोतील कामांचा बोजवारा; नागरिकांच्या जिवाला धोका

कचरा डेपोतील कामांचा बोजवारा; नागरिकांच्या जिवाला धोका
Published on: 
टुडे ३, मेन फिचर NSK26H34069 जळगाव : घनकचरा प्रकल्पाच्या संथ कामाबाबत आयुक्त आदित्य जिवने यांच्यासमोर संताप व्यक्त करताना उपमहापौर मनोज चौधरी. सोबत स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेविका जयश्री पाटील. ---- घनकचरा प्रकल्पातील विकासकामांचा बोजवारा उपमहापौरांचा संताप; नागरिकांचा आयुक्तांना घेराव, ३ वर्षांत केवळ १० टक्के काम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : शहरातील डंपिंग ग्राउंडवरील विकासकामांचा अक्षरशः बोजवारा उडाला असून, दोन ते तीन वर्षांपूर्वी कार्यादेश (वर्कऑर्डर) देऊनही काही कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. तर सुरू असलेल्या काही कामांची प्रगती अवघी १२ ते १३ टक्क्यांवर अडकली आहे. काही कामे ६० टक्क्यांवरच रखडली असून, कामांच्या गुणवत्तेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर प्रकाराची शुक्रवारी (ता. ३०) आयुक्त, महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कामांचा संथ वेग आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणावर उपमहापौर मनोज चौधरी यांनी संताप व्यक्त करत मनपाच्या तसेच ठेकेदारांच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली. निमखेडी शहरातील घनकचरा प्रकल्पातील कामांबाबत शुक्रवारी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त आदित्य जिवने यांनी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, शहर अभियंता आर. डी. पाटील, प्रकल्प अधिकारी योगेश वाणी, आरोग्य अधिकारी समीर बोरोले, नगरसेविका प्रतिभा देशमुख, जयश्री पाटील उपस्थित होते. नागरिकांचा आयुक्तांना घेराव पाहणीदरम्यान परिसरातील नागरिकांनीही आक्रमक भूमिका घेत आयुक्तांना घेराव घातला. या घनकरचा प्रकल्पाच्या संथ कामाबाबत तसेच डंपिंग ग्राउंडमुळे होणारा त्रासाचा नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचून दाखवला. प्रशासनाकडून वारंवार आश्वासने मिळत असली, तरी प्रत्यक्षात परिस्थिती बदलत नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. केवळ १३ टक्के काम विशेष म्हणजे, पाहणीची पूर्वसूचना देऊनही काही ठेकेदार घटनास्थळी उपस्थित नव्हते. दोन ते तीन वर्षांचा कालावधी उलटूनही कामे सुरू न होणे किंवा केवळ १२ ते १३ टक्क्यांपर्यंतच प्रगती होणे, ही बाब प्रशासनासाठी गंभीर ठरली. यापूर्वी सूचना देऊनही कामांत सुधारणा न झाल्याने संबंधित अधिकारी व अभियंत्यांनाही जाब विचारण्यात आला. चौकट ठेकेदाराला ‘अल्टिमेटम’ कामांच्या गुणवत्तेशी तडजोड सहन केली जाणार नाही. कार्यादेश मिळूनही कामे सुरू न करणाऱ्या ठेकेदारांकडून तातडीने कामे सुरू करून घ्यावीत. अपूर्ण कामांना गती देऊन निर्धारित मुदतीत ती पूर्ण करावीत, असे कडक निर्देश वरिष्ठांनी दिले. कोट घनकचरा प्रकल्पाच्या संथ कामाबाबत मक्तेदाराला वारंवार सूचना दिल्या आहे. मात्र अपेक्षित काम त्यांच्याकडून होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांना अंतिम नोटीस महापालिका प्रशासनाकडून दिली जाणार आहे. - आदित्य जिवने, आयुक्त. महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.