पाणी वाया घालवाल, तर दंड भरा

पाणी वाया घालवाल, तर दंड भरा
Published on: 
NSK26H33052 जळगाव : शनिपेठ परिसरात पाणीपुरवठा सुरू असताना पाण्यासंदर्भात पाहणी करताना महापौर दीपमाला काळे. सोबत नगरसेविका विद्या सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे व मनपाचे अधिकारी. .......... पाणी वाया घालवाल, तर दंड भरा पाणीगळती रोखण्याचे महापौरांचे निर्देश; नळांच्या तोट्यांची होणार तपासणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १९ : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील अपव्ययाला आळा घालण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी स्वःता प्रभाग ४ मधील शनिपेठ परिसरात पाणीपुरवठा सुरू असताना पाहणी केली. यावेळी अनेक ठिकाणी पाण्याची नासाडी होत असताना दिसून आल्याने नागरिकांना पाणी बचतीबाबत नागरिकांना सूचना दिल्या. तसेच यपुढे पाणी वाया घातल्यास आर्थिक दंडात्मक कारवाई केली जाईल, असे देखील कडक शब्दात सुनावले आहे. दरम्यान, शहरात सुरू असलेल्या वॉटर मीटर बसविण्याच्या प्रक्रियेचा पाणीपुरवठा विभागाचा महापालिकेत महापौरांनी आढावा घेतला. या बैठकीला पाणीपुरवठा विभागप्रमुख घृष्णेश्वर साळुंखे यांच्यासह विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यात मीटर बसविण्याची सद्यःस्थिती, कामाची पद्धत आणि संबंधित तपशील यांची सविस्तर माहिती तातडीने सादर करण्यास पाणीपुरवठा विभागाला सांगण्यात आले. शहरातील विविध भागांत नळजोडण्या आणि पाइपलाइनमधून पाणी गळती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी दुरुस्तीची कामे तातडीने करण्याचे निर्देश दिले. चौकट नळांना तोट्या बसविण्याच्या सर्वेक्षण करा शहरातील प्रत्येक प्रभागात नळांना तोट्या बसविल्या आहेत की नाहीत, याची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा सूचना पाणीपुरवठा विभागाला महापौरांनी दिले. तोट्या नसलेल्या नळजोडण्या शोधाव्यात आणि नागरिकांना तोट्या बसविण्याबाबत सूचना द्याव्यात, असे निर्देश महापौरांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com