पान-३
फोटो २ कॉ फक्त
YEO26B27196
जळगाव नेऊर : पाण्यावरील निबंध स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस प्रदान करताना पालखेड पाटबंधारे विभागाचे अधिकारी.
३०-२
जलसेवा संकल्प निबंध
स्पर्धत सृष्टी ठोंबरे प्रथम
-----------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१७ : जलसंपदा विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या जलसेवा संकल्प अभियानाअंतर्गत जळगाव नेऊर येथील शाळेत ‘भविष्यासाठी पाण्याचे महत्त्व’ या विषयावर निबंध स्पर्धा झाल्या. यात विद्यार्थ्यांनी पाण्याचे भविष्यातील महत्त्व शब्दबद्ध केले. या स्पर्धत सृष्टी ठोंबरे हिने प्रथम क्रमांक मिळवला.
जलसिंचन शाखा, एरंडगाव आणि नेऊरगावच्या अजिंक्यतारा पाणी वापर संस्थेतर्फे स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. तीन विजेत्या विद्यार्थिनींना शालेय भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जळगाव नेऊर येथील शाळेत हा उपक्रम घेण्यात आला. पाण्याचे महत्त्व, पाण्याचा योग्य वापर आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पाणी बचतीची गरज याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
बक्षीस वितरणप्रसंगी पालखेड पाटबंधारेचे उपविभागीय अधिकारी समीर साळवे यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व समजावून सांगितले. शाखाधिकारी मिलिंद पगार यांनीही पाण्याचा आवश्यकतेनुसार वापर करून बचत करण्याचे आवाहन केले. ‘मविप्र’चे तालुका संचालक नंदकुमार बनकर यांनी सहकार्य केले. कालवा निरीक्षक बदमोरे आणि सांगळे यांनी विशेष मेहनत घेतली. अजिंक्यतारा पाणी वापर संस्थेचे सचिव देविदास कदम यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
१६-१
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनी
प्रथम ः सृष्टी विठ्ठल ठोंबरे (नववी), द्वितीय ः आरती अशोक सोनवणे (दहावी), तृतीय ः मयूरी गणेश रसाळ (दहावी).
-------------