उन्हाचा चटका कायम; पावसाची शक्यता कमी उन्हाचा चटका कायम; पावसाची शक्यता कमी

उन्हाचा चटका कायम; पावसाची शक्यता कमी
उन्हाचा चटका कायम; पावसाची शक्यता कमी
Published on: 
टुडे एक ॲंकर (शहर - जिल्हा कॉमन) (संग्रहित चित्र वापरावे) ---- आगामी चार दिवस उष्ण हवामानाचा अंदाज पावसाची शक्यता कमीच; तापमान ३४ ते ३७ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१७ : जिल्ह्यात विजयादशमी (ता. २०) दरम्यान हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत आकाश बहुतांश निरभ्र ते अंशतः ढगाळ राहू शकते. कमाल तापमानात विशेष घट होण्याची चिन्हे नसल्याने दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कमाल तापमान साधारणतः ३४ ते ३७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १९ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. बहुतांश दिवस कमाल तापमान ३५ अंशांच्या आसपास राहू शकते. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात जाणवणारा फरक कायम राहण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी तापमानात काहीशी घट झाली, तरी उष्णतेपासून पूर्ण दिलासा मिळेलच असे नाही. दुपारच्या वेळेत वाढणारे तापमान, प्रखर सौरप्रारण आणि स्थानिक आर्द्रतेची स्थिती यांनुसार प्रत्यक्षात जाणवणारा उकाडा बदलू शकतो. विशेषतः शेतात काम करणारे मजूर, शेतकरी, बांधकाम कामगार आणि उन्हात दीर्घकाळ राहणाऱ्या नागरिकांना उष्णतेचा अधिक त्रास जाणवू शकतो. चौकट ‘एल निनो’चा रब्बीवरही परिणाम प्रशांत महासागरातील या हवामान चक्रामुळे मॉन्सून काळात पावसाची तूट निर्माण झाली. जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा सुमारे २३ टक्के कमी पाऊस झाला. पावसातील दीर्घ खंडामुळे जमीन कोरडी राहिली आणि ओलावा कमी झाला. खरीप हंगामातील कापूस, मका, सोयाबीन आणि इतर पिकांवर याचा थेट परिणाम झाला. अनेक भागांत पिके करपली किंवा वाढ खुंटली. काही तालुक्यांत पिकांचे नुकसान शंभर टक्के असल्याचे पंचनाम्यात दिसून आले. रब्बी पेरणीवरही याचा परिणाम होत असून पेरणी क्षेत्र कमी राहण्याची शक्यता आहे. जलसाठ्यांवरही दबाव वाढला आहे. काही धरणे भरली असली तरी एकूण पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. भूजल पातळी खाली जात आहे. -----
Marathi News Esakal
www.esakal.com