NSK26H33834
जळगाव : उत्तराखंड येथे नुकत्याच झालेल्या ग्रॅपलिंग- मलयुद्ध चॅम्पियनशिपमध्ये रौप्य व कांस्यपदक मिळविणारे जळगावचे पैलवान.
------
जळगावच्या तिघा पैलवानांची
ग्रॅपलिंग- मलयुद्ध स्पर्धेत बाजी
उपशीर्षक
नेपाळमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २८ : पैलवान हितांशू राजपूत, पैलवान भूषण हटकर आणि पैलवान शरद हटकर यांनी २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान उत्तराखंड येथे झालेल्या ग्रॅपलिंग- मलयुद्ध चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्यपदके आणि एक रौप्यपदक पटकावून महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर या तिन्ही पैलवानांची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. ही बाब संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.
या यशामागे त्यांचे वस्ताद पैलवान चेतन शिंदे, पैलवान कल्पेश मराठे, पैलवान आशिष ठाकरे आणि पैलवान भैया पिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कठोर परिश्रमांमुळे, सातत्यपूर्ण सरावामुळे आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे या तरुण पैलवानांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
प्रेरणादायी पाठिंबा आणि सहकार्य
जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या सहकार्याने आणि प्रोत्साहनामुळे या खेळाडूंना पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळाली. त्यांच्या पाठिंब्यामुळे या खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.