शहरातील विकासकामांसाठी २२ कोटींचा निधी

शहरातील विकासकामांसाठी २२ कोटींचा निधी
Published on: 
मेन फिचर --- NSK26H31250 : जळगाव : आकाशवाणी चौकाचे संग्रहित छायाचित्र. -- (महापालिका इमारतीचा फोटो टाकावा) शीर्षक आकाशवाणी सर्कल, अजिंठा चौकाचे पालटणार रूप विकासकामांसाठी २२ कोटींचा निधी; रस्त्यांसह ‘बालगंधर्व’, मनपा सभागृहाचाही विकास सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३ : शहरातील मूलभूत सुविधा आणि विविध विकासकामांना गती देण्यासाठी महापालिकेला विविध शासकीय योजनेंतर्गत सुमारे २२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून उपलब्ध झालेल्या या निधीतून शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्ते, गटारी, सार्वजनिक शौचालये, पाणीपुरवठा, उद्यान विकास आदी कामे केली जाणार आहेत. या विकासकामांना मंजुरी देण्यासाठी संबंधित प्रस्ताव ९ ऑक्टोबरला होणाऱ्या महासभेत मांडण्यात येणार आहेत. शहरातील अनेक भागांत मूलभूत सुविधांच्या कामांची गरज असताना विविध योजनांतून उपलब्ध झालेल्या निधीमुळे प्रभागनिहाय विकासकामांना चालना मिळणार आहे. विशेषतः रस्ते, गटारी व पाणीपुरवठ्यासारख्या नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. यामुळे विविध भागांतील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे. सभागृह, बालगंधर्वचे नूतनीकरण महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून महापालिकेच्या सभागृहाच्या नूतनीकरणासाठी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच महापालिकेचे बालगंधर्व नाट्यगृह आणि त्यालगतच्या उद्यानाच्या विकासासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रस्तावही महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. या कामांमुळे महापालिकेच्या प्रशासकीय सुविधांसोबतच शहरातील सांस्कृतिक व सार्वजनिक वापराच्या जागांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. रस्त्यांचे होणार डांबरीकरण प्रभाग १३ मधील गुरू पेट्रोल पंप ते शिरसोलीपर्यंतचा रस्ता डांबरीकरणाच्या प्रस्ताव महासभेत मांडला जाणार आहे. या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था होती. तसेच त्यात बाजूलाच असलेल्या नाल्यामुळे हा रस्ता अरुंद तसेच खड्डेमय असल्याने या रस्त्यावर अनेकदा अपघात झाले होते. प्रभाग १३ मधील नगरसेविका वैशाली पाटील यांनी या प्रभागातील या रस्ता दुरुस्ती करण्याबाबत आयुक्तांना निवेदन दिले होते. चौकट आकाशवाणी चौक, अजिंठा चौफुलीचा विकास शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक वाढत असल्याने आकाशवाणी चौक आणि अजिंठा चौफुलीच्या विकासाचा प्रस्ताव महापालिकेने पुढे आणला आहे. दोन्ही चौकांच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला असून, हा विषय येत्या महासभेत मांडण्यात येणार आहे. या चौकांवर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यात वाढणारी लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि शहरात ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा वाहतुकीचा ताण निर्माण होतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी करण्यासोबतच अपघातांचा धोका कमी करण्यासही मदत होऊ शकते. शहराच्या प्रमुख प्रवेशमार्गांवरील या दोन्ही चौकांचा नियोजनबद्ध विकास झाल्यास शहराच्या एकूण देखाव्यातही भर पडणार आहे. ................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com